आनंदनगर येथील पुरात अडकलेल्या ९७ जणांना एसडीआरएफच्या जवानाने काढले सुखरूप बाहेर!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम) तालुक्यात शुक्रवारी रात्री धुवाधार पाऊस कोसळल्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले होते.तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता पूस नदीच्या काठावर वसलेले महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे या पुराच्या पाण्यामुळे सुमारे ९७ महिला पुरुष लहान बाळ अडकले होते. सकाळपासून शासना कडून मदत मिळेल या आशेवर तात्काळत होते. पूरग्रस्तांनी सोशल मीडियावर पुराच्या परिस्थितीचा व्हिडिओ बनवून टाकला होता प्रशासनाने पाण्यातून बाहेर काढण्याची विनंती केली होती.
त्यावेळी प्रशासनाच्या वतीने शनिवारी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास आनंदनगर येथे हेलिकॉप्टर सुध्दा पाठवले होते परंतु हे हेलिकॉप्टर अनंतवाडी बेटावर असलेल्या ४० घरांच्या तांड्यावर उतरून तिथले लोक सुरक्षित हेलिकॉप्टरमध्ये बसवणे शक्य नसल्यामुळे शेवटी हेलिकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात यशस्वी झाले. तशी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतला.
नंतर नागपूर येथील एसडीआरएफच्या दोन पथक दाखल झाल्या त्यांनी पूरग्रस्तांना योग्यरीत्या रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलविले आनंदनगर हे महागाव तालुक्यातून वाहणाऱ्या पूस नदीपात्रातील एका छोट्याशा टेकडीवर वसलेले गाव आहे. अनंतवाडी या गट ग्रामपंचायतीचाच एक भाग आहे. परंतु पूस नदीचे पात्र आणि एका बाजूने मोठा नाला अशा जलाशयाने हे गाव वेढले गेले होते. इतर वेळी येथील नागरिक पाण्यातूनच एका छोट्या मार्गाने जाणे-येणे करतात. मात्र पावसाळ्यात त्यांचा इतर गावाशी संपर्क तुटतो त्यांना बाहेर निघणे कठीण होते त्यामुळे प्रशासनाने अशा घटना घडण्याच्या आधीच येथील नागरिकाचे योग्य ते पुनर्वसन करावे अशी मागणी केल्या जात आहे.
मी एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला होता यामध्ये प्रशासनाने आम्हाला या वेढलेल्या पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्याची विनंती केली होती ती माझी विनंती या विभागाचे आमदार,खासदार ,जिल्हाधिकारी, तहसीलदार, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार बांधव यांच्यापर्यंत पोहोचविली व आमच्या ९७ जणांना एचडीआरएफ च्या जवानांनी बाहेर काढले प्रत्यक्ष सहकार्य केल्याने सर्वांचेआभार मानले आहे-जगदीश राठोड (पूरग्रस्त नागरिक आनंदनगर)



