ईतर

यवतमाळ जिल्हाधिकारी व सीईओंची बदली;राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

यवतमाळ/प्रतिनिधी:राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तसेच कायम चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली करण्यात आली आहे.तर यामध्ये यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एमएससीईआरटी) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे येथे बदली झाली आहे. तर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून येत आहेत. तर गडचिरोली आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ. मैनाक घोष हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close