ईतर

मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या दत्ता पाटील हडसनीकर यांच्या उपोषणाला सकल मराठा समाज महागावचा पाठिंबा!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):मागील ०३ जुलैपासून हदगाव येथे दत्ता पाटील हडसनिकर हे मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. शासन दरबारी त्यांची कोणतीही दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे आज रोजी नांदेड येथे शासकीय रुग्णालयामध्ये ते भरती असुन त्यांची तब्येत अतिशय बिकट आहे त्यांची प्रकृती खालावली आहे येथील सकल मराठा समाज बांधवांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे महागाव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज दि.१८ जुलै २०२३ला महागावचे तहसीलदार यांना निवेदन देऊन दत्ता पाटील हडसणीकर यांच्या उपोषणाची दखल त्वरित घेण्यात यावी याकरिता तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
आता पर्यंत मराठा समाजाने अनेक मोर्चे, आंदोलने केले आहे. तसेच ४५ मराठा तरुण बाधवानी आरक्षणाकरीता आपला जिव गमावला आहे.

शासनाने आत्ता पर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. भविष्यात दत्ता पाटील हरसणीकर सारखे अनेक मराठा युवक रस्त्यावर येतील याची गंभीर दखल शासनाने घेऊन मराठा आरक्षण हा विषय मार्गी लाऊन मराठा समाजाला संविधानिक न्याय द्यावा या करिता सकल मराठा समाज महागाव तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close