पुसद तालुक्यातील ७३ टक्के पेरण्या पुर्ण;कापसाची लागवड सर्वाधिक, सोयाबिन पेरणीला वेग

पुसद : यंंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत होता. हवा तेवढा पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या पुसद तालुक्यात पावसाचेे वातावरण निर्माण झाला असून रिमझिम पाऊस सुरू आहे.पंधरवाड्यापुर्वी पडलेल्या काही प्रमाणात पावसावर अनेक शेतकर्यांनी कपाशीची लागवड व सोयाबिनची पेरणी केली होती.तालुक्यात ५जुलै पर्यंत ७३.४१ % पेरणी झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.यंदाचा पावसाळा महिनाभर उशिराने दाखल झाला. यामुळे जूनमध्ये होणाऱ्या पेरण्या खोळंबल्या. धूळवाफ झालेल्या पेरण्या धोक्यात येणार असे वाटत असतानाच रिमझिम पावसाने जीवदान मिळाले.७५ते१०० मिमी पाऊस होईपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. परंतु, शेतकऱ्यांनी धाडसाने पेरण्या करुन पावसाच्या प्रतिक्षेत होते. जूलैच्या सुरवातीला पावसाच्या काहीशा शिडकाव्याने उगवलेले पीक तग धरले. पाणी सोडून सरीच्या बांधावर सोयाबीन टोकणले होते. पाऊस नसल्याने सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागते की काय, अशी भिती बळीराजा व्यक्त करीत होता. परंतु या पिकालाही दिलासा मिळाला आहे.पाऊसच अगदी नगण्य झाल्याने पेरणीसाठी सज्ज असलेली काही शेती तशीच आहे. यामुळे शेतकरी अधिकच चिंतेत आहेत.खऱ्या अर्थाने सध्या पावसाचे वातावरण असून रिमझिम पाऊस सुरु झाला. पुसद तालुक्यात खरीप हंगामात ७५,०५० हेक्टर एवढी जमीन लागवडी व पेरणीखाली येते.खरीप हंगाम २०२३— २०२४ मध्ये गळीतधान्य सोयाबिनची पेरणी ३५,८१५ हेक्टरवर नियोजित होती तर नगदी पिकात कापुस २४,४७० हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे.तृणधान्यात ज्वारी९९५ हे. ,कडधान्यात तुर ९,९९७ हे.,मुग ९६६ हे.,उडिद ८६५ हे. तर ईतर पिकात हळद ७६६ हे.,भाजीपाला व चारा पिके ९९५ हेक्टरवर नियोजित होते.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यात ५४,३३६ हेक्टरवर पेरणी झाली असुन यात सोयाबिन २२,४३२ हे.,कापुस २५,३६२ हेक्टरवर लागवड पुर्ण झाली आहे.तर तुरीची ५,७४९ हे.,मुंग ३१५,उडिद ३४५,ज्वारी ३४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.कपाशीची लागवड तालुक्यात शंभर टक्के पुर्ण झाली असल्याचा अंदाज व्यक्त केल्या गेला असुन पावसाअभावी टोबलेल्या जागी न निघालेल्या ठिकाणी शेतकरी कपाशी सांधवत आहेत.तालुक्यात १८,०१० हेक्टर जमीन भारी पोताची,२३,२०९ हे.मध्यम तर ३३,८३१ हेक्टर जमीन हलकी असुन यात कपाशी,उडिद व मुंगाची लागवड केल्या जाते.मागील चार-पाच दिवसांपासुन पावसाचे वातावरण निर्माण झाले असुन लवकरच उर्वरीत क्षेत्रावरील पेरणी पुर्ण होईल असे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.यंदा पावसाळा लांबल्याने पेरण्या लांबल्या आहे. 
पुसद तालुक्यातील माळ पठार भागात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशीची लागवड केली होती पाऊस नसल्यामुळे पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही काल सायंकाळी पाऊस पडल्यामुळे आज अनेक शेतकरी दुबारा कपाशी व सोयाबीनची लागवड करीत आहेत.पुसद तालुक्यातील सत्तरमाळ येथील एका शेतात कपाशीची लागवड करताना महिला शेतमजूर
यापुढे पाऊस नियमित पडल्यास चांगला हंगाम येईल अशी आशा बळीराजा बाळगुन आहे.



