शैक्षणिक

कु.खुशी उमेश पांडे नवोदय परीक्षा प्रवेश पात्र!

महागाव/प्रतिनिधी(संदीप कदम):-गिरजा नगर महागाव येथील निवासी उमेश पांडे व मिनाक्षी पांडे या शिक्षक दांपत्यांची कन्या कु.खुशी पांडे ही शैक्षणिक सत्र २०२३- २४ साठी घेण्यात आलेल्या केंद्रीय परिक्षेत इयत्ता सहावी प्रवेश पात्र ठरल्याने मित्र वर्गासह आप्तस्वकियातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.प्रामुख्याने तालुका उमरखेड या अभयारण्यातील डोंगराळ गावातून आपली शैक्षणिक कारकीर्द सुरू केलेले शिक्षक उमेश पांडे व त्यांच्या सौभाग्यवती मीनाक्षी पांडे या शिक्षक दाम्पत्यांनी आपल्या अभयारण्यातील एकंबा गावाला लागलेला डोंगरी वसा पुसून काढण्यासाठी आपली कन्या कुमारी खुशी हीस नवोदय परीक्षेत बसून तिला घवघवीत यशाने प्रवेश पात्र ठरवले ज्यामुळे प्रथमच एकंबा गावातून शालेय जीवनाच्या पहील्याच स्पर्धा परीक्षेतून पात्रते सह उतिर्ण केले.तेव्हा केंद्रीय अभ्यासक्रमात निवड होणारी खुशी ही परिवारासह एकंबा गावातील पहिलीच विद्यार्थी असल्याने महागाव, कोर्टा,एकंबा सह परिसरातील शिक्षण प्रेमी आप्तस्वकीय, व मित्रवर्गातून कु.खुशिचे कौतुक व पालकांचे अभिनंदन केले जात आहेत.यावेळी आधार एक पाऊल मानवते कडे चे संयोजक तथा पत्रकार प्राचार्य गजाननजी भारती सर, बाबाराव वानोळे नि.शि.अ., व देसाई नवोदय क्लास चे मार्गदर्शक देसाई सर, विनोद कांबळे, प्रभाकर अडलूरे, बालाजी देशमाने, अवधूत साबळे , दिलीप जाधव सर, गजानन खराटे,अंमृत अंभोरे आदी शिक्षकांसह पोलिस जमादार मुखाडे साहेब, मस्के साहेब, राठोड साहेब महाराष्ट्र पोलिस, सह राहुल वानखेडे, ईश्वर राठोड, राहुल पाटील नरवाडे, डाॅ.पेंढारकर, डाॅ.खैरे, साहेब, अनिल मस्के, वानखेडे दुकानदार, अनिकेत उफाडे, भोजाजी लांबटीळे, सुनिल चौधरी, नामदेव गणपत पांडे, सौ.चंद्रकला ना. पांडे, व विश्वनाथ गिरजाजी खराटे, सौ. प्रयागबाई वि.खराटे यांच्यासहआजी आजोबा आदींनी कु.खूशीचे नवोदय पात्रता यशाबद्दल शुभेच्छा देवून अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close