वसंत नगर पोलीस स्टेशनच्या आवारात देवतांडा येथील इसमाने विष घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न!

पुसद: शहरातील वसंतनगर पोलीस स्टेशनच्या आवारात देव तांडा सांडवा -मांडवा येथील रहिवासी असलेल्या बादल देवसिंग चव्हाण वय ३२वर्ष या इसमाने २५ जून रोजी ११.१५ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी हा पोलीस स्टेशनमध्ये येऊन जोर जोराने आरडाओरड करून माझी नाणी सासू माझ्या बायकोला माझ्यासोबत माझ्या घरी पाठवत नाही व बायको सुद्धा माझ्यासोबत घरी यायला तयार नाही असे आरडाओरडा करत असताना अचानकपणे त्यांनी त्याच्या खिशातून विषाच्या औषधाची बॉटल काढून विष प्राशन केले. पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही कळण्याच्या आतच सदरील घटना घडल्यामुळे खळबळ उडाली तात्काळ आरोपीला येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सदरील आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. यावरून आरोपी विरुद्ध फिर्यादी रमेश रामचंद्र इंगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत नगर पोलीस स्टेशन वसंत नगर यांच्या फिर्यादीवरून कलम ३०९ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



