ऊस पिकाच्या नुकसान भरपाईसाठी सवना येथील शेतकरी देशमुख करणार अन्नत्याग आंदोलन !

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षित पणामुळे मार्च २०२२ मध्ये सवना शेतशिवारात गोविंदराव देशमुख यांचे दोन एक्कर क्षेत्रातील ऊस पिक संपूर्ण जळुन गेले होते यात त्यांचे दीड ते दोन लाख रुपये नुकसान झाले ही आग देशमुख यांचे शेतातुन गेलेल्या ३३ के.व्ही.तारांच्या शाँट सर्किटमुळे लागली होती आणि ही घठना घडण्यापुर्वी कंपणीला लेखी पत्राद्वारे कळुन सुध्दा संबधीत अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने देशमुख यांना नुकसान सोसावे लागले नंतर विजवितरण कंपणीचे अधिकार्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन चुक मान्य करुन नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले पंरतु प्रत्यक्ष भरपाई देण्यास दिरंगाई होत आसल्याने देशमुख यांनी २६ जानेवारी२०२३रोजी तहसील कार्यालय समोर आन्नत्याग आंदोलन करण्याचे निवेदन सादर केले त्यावेळी एक महिण्यात भरपाई देण्याचे लेखी पत्र देऊन त्यांचे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आता पाच महिने उलटून गेली तरी कंपनीने शेतकरी प्रति कोणतीही दखल घेत नसल्याने देशमुख यांनी १जुलै२०२३ पासुन नुकसानभरपाई मिळेपर्यंत बेमुदत अन्नपाणी त्याग आंदोलन करणार असल्याचे आज लेखी निवेदन तहसीलदार महागाव यांना सादर केले देशमुख यांनी भरपाई मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे सांगत सहकार्य करीत असल्याबद्दल नवनियुक्त एसडीओ व तहसीलदार मँडमचे आभार मानले



