ईतर

पुसद न.प.मध्ये मालमत्ता करवाढ प्रकरणी स्थगीतीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश-ॲड.उमाकांत पापीनवार

पुसद: येथील नगर परीषद मध्ये सन २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीसाठी फेर मूल्यांकन कर आकारणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अवाढव्य कर आकारणी सुरू असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच एकूण २२ हजार मालमत्ता पैकी तब्बल १७ हजार मालमत्ता संदर्भात नागरीकांनी आक्षेप नोंदविले होते. याबाबत खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अँड .उमाकांत पापीनवार यांनी आपल्या सहकाऱ्यां सोबत मागील काही महिन्यांपूर्वी जनआंदोलन उभे केले होते. दरम्यान या आंदोलनाची दखल घेत सदर आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून मालमत्ता करात प्रचंड वाढ झाल्यामुळे नागरीकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या प्रक्रीयेतील मालमत्ता धारकांच्या अपीलीवर नगर पालीका अधिनियम १९६४ चे कलम १६९ (२) नुसार निर्णय घेणारी समिती आजच्या स्थितीला अस्तित्वात नाही, पुसद येथे सध्या प्रशासक कारभार सांभाळत असून जुन्या कराच्या ५ ते १० पट कर आकारला जात आहे. त्यामुळे खासदार भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन पुसद नगर परीषद मध्ये फेरमुल्यांकन प्रक्रियेला स्थगीती देण्याची मागणी केली होती. दुसरीकडे जिल्हा प्रमुख ॲड. उमाकांत पापीनवार यांच्या नेतृत्वात संबंधित विभागाच्या नगरपरिषद पुसद कार्यालय येथे पुसद नगरपरिषद कार्यालयात मालमत्ता धारकांनी शिवसेनेच्या मदतीने आक्षेप नोंदणी अर्ज नोंदविण्यास सुरूवात केली. यामध्ये शहरातील समस्त मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात १६ हजार६७०  आक्षेप अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेनेच्या या आंदोलनाला अखेर यश प्राप्त झाले. सन २०१८-१९  ची कर मागणी ५ कोटी ७ लाख ६२ हजार ७२४ होती व सन२०२३-२४ ची प्रस्तावित कर मागणी ११ कोटी ९९ लाख ५९ हजार ३८ अशी होती. त्यानंतर शिवसेना पुसदच्या वतीने सुरू असलेल्या पहिल्या टप्यातील आंदोलनात प्राधिकृत मुख्य निर्धारण अधिकारी सहाय्यक नगर रचना विभागाच्या वतीने करण्यात आलेली करवाढ ही कमी करून ९ कोटी ७६ लाख  हजार ७५८इतकी झाली आहे. व नागरिकांना मालमत्तेत २ कोटी २५लाख करवाढ कमी झाल्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले असले तरी ही जुलमी करवाढ पुसदकरांना मान्य नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने ही लढाई सुरुच ठेवणार असल्याचे अँड.उमाकांत पापीनवार यांनी आज दीप संध्या हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. दूसरीकडे शासन स्तरावर सुध्दा खासदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्यामुळे तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आदेश दिल्याने जुलमी करवाढीवर स्थगीती चे आदेश प्राप्त झाले आहेत. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आंदोलनातील शिवसेनेचे जेष्ठ नेते राजन मुखरे,दीपक काळे, संजय बयास, दीपक उखळकर, अनिल चव्हाण, संतोष आंबोरे, संदीप लाभसेटवार,लक्ष्मण आगाशे ,अरुणविशाल पेंशनवार शिवाजी मस्के संतोष राठोड संजय जोगदंड, लखन राठोड, युवासेना उपजील्हा अधिकारी मिथिलेश काळे, तालुका अधिकारी अजित पवार, मिलिंद बांडे ,अनिल बेले ,अरुण जाधव ,बबनराव पाईकराव, अमोल सोनटक्के, राजू मडके, विष्णू तगडपलेवर ,विश्वास मुजमुले, माधव वानखेडे, अनिल तोंडारे, प्रकाश सहतोंडे, गणेश खटकाळे, शाम ठाकूर अमोल पेंढारे तेजस कानेड अनिल काटकर विजय ससाणे अजय संघयी भारत मोदीराज सचिन महामुने सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहे. पाठपुरावा सुरुच ठेवणार..

नगर परीषदेने केलेली करवाढ ही जुलमी स्वरुपाची असून ती आम्हाला मान्य नाही. या विरोधात आम्ही सुरु केलेली लढाई अजुन संपलेली नाही. जोपर्यन्त या करवाढीवर योग्य निर्णय होत नाही तोपर्यन्त आम्ही पाठपुरावा सुरुच ठेवणार आहो अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली..
ॲड.उमाकांत पापीनवार
शिवसेना जिल्हाप्रमुख, यवतमाळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close