पुसद शहरात रविवारी शिवसामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन होणार;१३८७४ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

पुसद: दि.२ फेब्रुवारी२०२४छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद द्वारा आयोजित आणि भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था पुसद द्वारा प्रायोजित शिवसामान्यज्ञान परीक्षेकरिता तब्बल १३८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त रविवार, चार फेब्रुवारी रोजी परिक्षेचे आयोजन केले आहे. परिक्षेकरीता सर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतून प्रवेश पत्राचे करण्यात आले आहे. परीक्षेसाठी दोन गट असून दोन्ही गटासाठी स्वतंत्र बक्षिसे आहेत. परीक्षा निःशुल्क असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.अ गट इयत्ता चौथी ते सातवीची परीक्षा सकाळी नऊ ते दहा तर इयत्ता आठवी ते बारावीची वेळ सकाळी ११ ते १२ वाजे पर्यंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ५० प्रश्न विचारल्या जाणार आहेत. परिक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असणार आहे.ही परीक्षा ३८ केंद्रावर संपन्न होणार आहे. येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गो मु कनिष्ठ महाविद्यालय, श्री शिवाजी विद्यालय , गुणवंतराव देशमुख विद्यालय कवडीपुर, महात्मा मुंगसाजी विद्यालय, महात्मा मुंगसाजी प्राथमिक शाळा, शकुंतलाबाई देशमुख प्राथमिक शाळा, मातोश्री विद्यालय श्रीरामपूर, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर, वसंतराव पुरके कॉलेज बोरगडी, माईसाहेब मुखरे प्राथमिक शाळा, गणपतराव पाटील विद्यालय बोरगडी, वसंतराव नाईक विद्यालय, श्रीराम आसेगावकर विद्यालय, लोकहित विद्यालय, नगरपरिषद प्राथमिक शाळा इटावा, जेएसपीएम विद्यालय इटावा , पोदार लर्न स्कूल, ओयासिस इंग्लिश स्कूल, सेंट मेरीज इंग्लिश स्कूल, माउंट लिटरा स्कूल, जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल, एम पी एन कॉन्व्हेंट, नवजीवन ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल, गुरुकुल इंग्लिश स्कूल श्रीरामपूर, इंग्लिश मीडियम आश्रम शाळा गोविंदनगर, सावित्रीबाई फुले शाळा, जिजामाता कन्या शाळा, जिल्हा परिषद वसंतपूर, राष्ट्रीय विद्यालय आडगाव, म. नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळा येरंडा, निजधाम विद्यालय मुडाणा, मातोश्री विद्यालय महागाव, श्री शिवाजी विद्यालय सवना, एच सी एच हायस्कूल हिवरा, बा.ना. विद्यालय पारवा आणि जगदंबा विद्यालय शेलु यांचा समावेश आहे.समितीचे मार्गदर्शक तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे मार्गदर्शनात समिती प्रमुख चंद्रकांत ठेंगे यांनी पारदर्शक परीक्षा आयोजनासाठी नियोजन केले आहे. समिती सदस्य अजय क्षीरसागर, अमोल व्हडगिरे, शशिकांत जामगडे, किरण देशमुख, अमोल शिंदे, उमेश इंगळे, मुख्याध्यापक किरण देशमुख, नागेश जोगदे, रवींद्र घड्याळे, गजानन इंगोले, चंद्रशेखर देशमुख, यशवंत देशमुख, आकाश देशमुख, मुख्याध्यापक अजय खैरे आदींनी पुढाकार घेतला आहे. सर्व शाळांचे संस्था प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे सहकार्य मिळत आहे.या निमित्ताने छत्रपतींच्या विचारांचा जागर विद्यार्थी पालकांमध्ये होत आहे. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी करण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ आहे. परिक्षेचे शिस्तबद्ध नियोजन, पारदर्शक निकाल यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण झाल्याने अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे परीक्षा समिती प्रमुख चंद्रकांत ठेंगे यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नरत आहेत.



