ईतर

शॉर्ट सर्किटमुळे घराला भिषण आग; संसारोपयोगी साहित्यासह २ लाखाची रोकड व सोनं जळून खाक!

पुसद : शहरातील मुंगसाजी नगर येथील घराला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे सकाळी८:०० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य व विद्युत उपकरणे जळून खाक झाले आहे. यामध्ये १२ ते १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद शहरातील मुंगसाजी नगर येथील रहिवाशी असलेले राजकुमार नंदकुमार धाबे व्यवसाय- नोकरी यांच्या घरी आज सकाळी अंदाजे ८:०० वाजण्याच्या सुमारास अचानक घराला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दरम्यान, स्थानिकांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग आटोक्यात आली नाही. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तेव्हा अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.

तोपर्यंत या घराला लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीने रौद्ररुप घेत घरातील साहित्यांसह विद्युत उपकरणे ४० ग्राम सोने, दोन लाख रोकड,व इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे राजकुमार धाबे यांच्या अंगावर कपडे शिल्लक राहिली असून यांचा संसार उघड्यावर पडला आहे.

सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही ग्राम महसूल अधिकारी पुसद खंड -१ सा.क्रं. ३० यानी पंचनामा केला असून या पंचनामा मध्ये या आगीच्या दुर्घटनेत १२ ते १५ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close