जिद्द, चिकाटीच्या जोरावर पुसद चा रवि गौरशेटीवार सी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण

पुसद : येथील सुभाष वार्डामधील राहणारा रविकुमार नंदकिशोर गोरशेट्टीवार यांनी नुकतीच सी.ए.ची परिक्षा उत्तीर्ण केली. त्याचे प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या शाळेत झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयात झाले. पुढील शिक्षणा करिता त्याने आपल्या मनातील इच्छे प्रमाणे पुणे येथे सनदी लेखापाल सी.ए.चे शिक्षण घेण्यासाठी गेला. अथक परिश्रम व महेनोतीच्या जोरावर अतिशय कठीण असणारी सी.ए.ची उत्तीर्ण केली. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्याने हे यश संपादन केल्यामुळे समाजातुन सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपली आई सरस्वती नंदकिशोर गोरशेट्टीवार व मामा बाबु तातेवार यांना दिले आहे. रविकुमारने सी.ए.ची परिक्षा उत्तीर्ण केल्याने विश्वनाथसिंह नागरी सहकारी पतस्थेंचे अध्यक्ष निशांत बयास यांनी त्यांच्या घरी जावून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. आर्यवैश्य समाजाच्या वतीने त्याच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.



