अन् क्षणात होत्याचे नव्हते! पुसद शहरापासून जवळच असलेल्या भवानी टेकडी जवळ भीषण अपघात;दोनजण जागीच ठार तर चारजण गंभीर जखमी!

पुसद: वाशिम रस्त्यावरील भवानी टेकडी जवळ दि.२२ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले.याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यातील वाशिम पुसद रस्त्यावरील निंबी गावाजवळील भवानी टेकडी जवळ दि.२२ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले. असून यापैकी ३ जखमींवर पुसदच्या मेडीकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु असुन एकाला नांदेड येथे रेफर करण्यात आले. असून चारही जखमींची प्रकृती गंभिर असल्याची माहीती सुत्रांकडून प्राप्त झाली. मृतका पैकी एक मुंबई वरुन मावश बहीणी कडे राखी बांधण्यासाठी आई सोबत पुसद येथे आला होता. व गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी अंत झाला. बहिणी कडे मुंबई वरुन राखी बांधण्याकरीता आलेल्या आकाश मधुकर जाधव रा. ब्राम्हणगांव हा ठार झाला तर त्याचा मित्र ऋषिकेश प्रभाकर टाले वय २२ वर्षे रा. मधुकर नगर हा सुद्धा जागीच ठार झाला.आकाश मधुकर जाधव रा.ब्राम्हणगांव हल्ली मुक्काम मुंबई वरुन मावश बहिणीकडे राखी बांधण्याकरीता आला असता पुसद मध्ये मित्र राहत असल्याने तो पुसद ला मित्राला भेटण्यासाठी आला व आपल्या मित्राला जमा करून सर्व मित्रा समवेत एम.एच.१२/९३४५ या कारने रात्री ११.३० वाजता खंडाळ्याच्या दिशेने सहा मित्र निघाले असता भवानी टेकडी जवळ भरधाव वेगात असलेल्या कारवरचे नियंत्रण सुटल्याने ही कार विद्युत विभागाच्या खांबाला जोरदार धडकल्याने त्यामध्ये दोघाजणाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की क्षणात होत्याचे नव्हते झाले. तर या अपघातातील अक्षय पाईकराव, विजय पोटे, तुषार आडे हे गंभीर जखमी झाले अधिक तपास वसंत पोलीस करीत आहे. मध्यरात्री वाहन चालविणाऱ्यास कदाचित झोपेची डुलकी आली असावी. किंवा हे वाहन नशेत चालवित असावे असा पोलिसाचा कयास असून त्यामुळेच या कारचा भीषण अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे सुसाट वेगात असलेले कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर जावु धडकल्याने हे विद्युत खांब जमीनीतुन उखडले असून त्यामुळे त्या वाहनाचा चकनाचुर झाला आहे. जखमी व मृतकांना बाहेर काढतांना खंडाळा पोलिसांना सकाळ झाली. त्यानंतर मृतदेह पुसद येथील शासकीय जिल्हा उपरुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.