रॉंग साईड वाहन चालविणे रिटायर पोलीस हेड कॉन्स्टेबलला पडले महागात

पुसद: ते दिग्रस रोडवरील फुलसिंग नाईक महाविद्यालयासमोर दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या दुपारी १.३० ते १.४५ वाजताच्या दरम्यान ट्रक व ह्युदाई आय ट्वेन्टी कारचा भीषण अपघात झाला.या अपघातामध्ये रिटायर पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांनी यु टर्न घेण्याचे टाळून रॉंग साईड कार चालविल्याने महागात पडले आहे.या अपघातामध्ये सुदैवाने जीवित हानी टळली असून वाहन चालकाला कुठल्याही प्रकारचे गंभीर दुखापत झाली नाही.वृत्त लिहोस्तोवर प्रकरण आपसी निपटविल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार पुसद वरून दिग्रस कडे ट्रक क्रमांक एमएच ३४,एबी ३७९९ जात होतो. त्याचवेळी हेड कॉन्स्टेबल दत्ता राठोड हे ह्युंदाई आय ट्वेन्टी वाहन क्रमांक एमएच १२,एचएल ४४५४ मधून फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या समोरून यु टर्न घेण्याऐवजी रॉंग साईडने जात असताना डिव्हायडरला आदळल्याने अपघात घडला आहे.घटनेची माहिती कळताच वसंत नगर पोलिसांचा व शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकांचा ताफा घटनास्थळी दाखल झाले होता. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अथक परिश्रम घेतले होते.एकंदरीत रॉंग साईडने पोलीस हेड कॉन्स्टेबल जाताना अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे.अपघात प्रकरणी कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नव्हती.