राजकिय

कोणता पक्ष ठरणार भारी आणि कोण होणार पुसद शहराचा कारभारी? नगर परिषदांच्या निवडणुकीचा फैसला उद्या, उत्सुकता शिगेला!

१५ प्रभागासाठी ७ टेबलवर ११ राऊंड मतमोजणी; निवडणुक प्रशासनाची मतमोजणीची तयारी पूर्ण‎!

पुसद : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर गेल्या १९ दिवसांपासून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मतमोजणी प्रक्रियेला उद्या, २१ तारखेला प्रारंभ होत आहे. शहरातील दवा बाजार लागून असलेल्या योगाभवन येथे ही मतमोजणी होणार असून, प्रशासनाने यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. सकाळी १० वाजता मोजणीला सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुसद स्थानीक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५साठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते परंतु नगरपरिषदांच्या मतमोजणीची प्रक्रिया काही ठिकाणच्या निवडणुकीमुळे कोर्टाच्या आदेशाने पुढे गेली होती. यामुळे अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून पुसद नगरपरिषदेच्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार असल्याने कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण ६२२३२ मतदार आहेत. त्यापैकी ३९१७० मतदारांनी आपला मताचा हक्क बजावला असुन ६१.९५ टक्केवारी आहे. त्यात मताचा पुरुषांचा टक्का वाढला आहे. तर स्त्रि मतदार माघारला आहे. एकुण पुरुष २४३४५ यांनी मताचा हक्क बजावला. तर १८८२५ स्त्रियांनी मताचा हक्क बजावला. त्यामुळे पुरुष ६४.२० तर स्त्रि. ५९.६९ असे मताची टक्केवारी आहे. तर २४०६२ मतदानांनी या मतदान प्रक्रियेसाठी पाठ फिरविण्याचे चित्र दिसले.निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ९ व१५ प्रभागात एकुण १४२ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात होते. प्रशासनाच्या वतीने मात्र मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती तेवढी न केल्यामुळे मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ३९,१७० झाल्याने मतदानाची टक्केवारी ६१.९५ टक्के झाली होती. यात विशेष करून पाच तृतीयपंथी असताना त्या एकाही तृतीयपंथ यांनी मतदान केले नव्हते. शहरातील १५ प्रभागासाठी १ राऊंड होणार असून सर्वप्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होणार आहे.त्यानंतर एक प्रभागासाठी एक टेबल असल्यामुळे एक प्रभाग संपेपर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे.सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून दुपारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

मतमोजणीच्या दिवशी५०अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असून त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत.प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेल्या आहेत. वृत्तपत्राच्या व माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था (माध्यम कक्ष) तयार करण्यात आले आहेत. परंतु या निवडणुकीमध्ये मतदार नेमका कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.गेल्या १९ दिवसापासून पोलीस प्रशासनाकडून स्ट्रॉंग रूमवर कडक नजर ठेवण्यात आली होती. त्यासोबत सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने त्याचेही अपडेट घेण्यात येत होते.दररोजची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.आशिष बीजवल यांच्याकडे देण्यात येत होती. या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. सर्वच मोठे नेते या प्रचारात सहभागी झाले होते. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत आणखी वाढली होती आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र गेल्या १९ दिवसापासून चौका चौकात, चावडीवर, पायऱ्यांवर आणि घराघरात सुद्धा या नगरपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा एवढ्या दिवसात रंगल्याचे दिसून आले तर आम्ही जिंकणार हा दावा देखील सर्वच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून या दिवसात होताना दिसला. मात्र आता या सर्व चर्चांना फुलस्टॉप मिळणार असून उद्या या सर्व जागांची मतमोजणी सकाळी १०:०० वाजता सुरू होऊन अगदी काही तासातच संपणार असल्याने शहरात कोणता पक्ष भारी आणि कोण उमेदवार कारभारी हे समोर येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close