श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने मतदान जनजागृती

पुसद : स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद राष्ट्रीय सेवा योजना+२ च्या वतीने पुसद नगरपरिषद च्या निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी आपला हक्क बजवावा व राष्ट्रीय कर्तव्याचे साक्षीदार व्हावे हा संदेश देण्यासाठी पुसद शहरामध्ये मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. प्राचार्य रामचंद्र हिरवे, गटशिक्षणाधिकारी धीरज आडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. गजानन जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित मतदान जनजागृती रॅलीत मतदानाचा जागर घालून मतदानाचे महत्त्व विशद करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, तीन पुतळा चौक, बस स्टॅन्ड या मार्गाने पुसद शहराच्या प्रमुख चौकात वैविध्यपूर्ण पथनाट्य सादर करून मतदानाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार वैभव खाडे , गटशिक्षणाधिकारी धीरज आडे, प्राचार्य रामचंद्र हिरवे ,शिक्षण विस्तार अधिकारी, अमित बोजेवार, उपप्राचार्य दत्तात्रय जीवने यांची रॅलीमध्ये प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०० स्वयंसेवकासह कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सहभागी होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. भाऊसाहेब देशमुख महिला कार्यकामाधिकारी प्रा योगिता काष्टे, प्रा निलेश जाधव सहकार्यकमाधिकारी प्रा अमोल राठोड, प्रा असिफ शेख, विद्यार्थी प्रतिनिधी अभिजीत खनके विद्यार्थिनी प्रतिनिधी शिवानी चव्हाण, मुंगाराम बोंबले, सुमित भोयर यांनी पुढाकार घेतला.



