महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव डॉ.मोहम्मद नदीम यांच्या वाढदिवसी डी एन ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा !

पुसद: शहरासह तालुक्यात ज्येष्ठापासून युवकांपर्यत, तसेच नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्या मनात आपुलकीची व आपलेपणाची संबंध प्रस्थापित करणारे आपल्या एकुण सामाजिक, राजकीय वाटचालीत, अनेक अडथळ्यांना तोंड देत…अडथळ्यांमूळेच आपल्यातील तेज व्यक्त करीत, शून्यातून कर्तृत्व सिध्द करणारे,अंगभूत बौध्दीक चमक, अमोघ – वैविध्यपूर्ण पण व्यासंगी वक्तृत्व, अफाट कष्ट घेण्याची सवय, मनमिळावू स्वभाव, संघटन कौशल्य, विनम्रता आणि माणसं पारखण्याची निसर्गदत्त बुध्दी आणि कोणाच्याही संकटसमयी धावून जाण्याची उपजत वृत्ती, हाती घेतलेल्या कामा तड लावण्याची सवय,गेल्या कित्तेक वर्षाहून अधिक काळ अखंड उत्साह अविरत काम, संघटनात्मक बांधणी, प्रचंड लोकसंग्रह, मिळेल त्या संधीचे सोने करण्याची धडाडी, सामान्यांच्या न्याय हक्कासाठीचा आक्रमकपणा, अभ्यासपूर्ण संघर्ष, जीवनदृष्टी आणि प्रत्यक्ष जीवन यांचा समन्वय साधण्यात आलेले यश, कर्तृत्त्वाने पदाची प्रतिष्ठा वाढविण्याची धमक ,कुशाग्र बुध्दिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा अनेक गुणांच्या आयामांचे, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणाऱे सर्व जाती धर्मातील जनसामान्य नागरिकांना एकत्रित ठेवणारे पुरोगामी विचाराचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव तथा नगरपरिषद पुसदचे माजी उपाध्यक्ष डॉ.मोहम्मद नदीम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी केक कापून ढोल ताशांच्या गजरात त्यांच्या सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. डॉ. नदीम यांचे निवासस्थानी लाॅनवर डी एन ग्रुपच्या सदस्यांनी पाच मजली भव्य दिव्य केक आणून व तसेच भला मोठा पुष्पहार घालून त्यांचे अभिष्टचिंतन केले.दिवसभरात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन वर, समाज माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
निवासस्थानातील कार्यक्रमानंतर बस स्थानकाजवळ शेंबाळपिंपरी पॉईंट येथे महेबूब भाई यांच्या नेतृत्वात मोटार वाहन चालक मालक यांनीही डॉ. नदीम यांना बोलावून तेथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याच सोबत वसंत नगरातील हाजी हमीद खान चौक येथे पाशाभाई मित्र परिवाराच्या वतीने केक कापण्यात आला तसेच अल्पसंख्यांक आघाडीचे अमजद बिल्डर यांचे निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा केला. बहुजनांचे राष्ट्रव्यापी संघटन असलेल्या बामसेफच्या पुसद शाखेच्या वतीनेही तहेसीनभाई पैलवान यांच्या नेतृत्वात वाढदिवस साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे भर पावसात दुर्गामाता चौक ते टिपू सुलतान चौक अशी डॉ नदीम यांची घोड्यावर बसून मिरवणुक काढली.आणि टिपू सुलतान चौकामध्ये अथहरभाई मित्र मंडळाच्या वतीने फटाक्याच्या निनादात भव्य दिव्य केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. त्याचप्रमाणे लोहार लाईन येथे एकता बहुउद्देशीय मंच तसेच खाटीक, बागवान, तेली, लोहार बिरादरी यांच्या वतीनेही केक कापण्यात आला. तर गढीवार्ड येथे प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे सचिव ईश्तियाक भाई यांचे वतीने शाळेसमोर तरुण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. मधुकर नगर ग्रामपंचायत तर्फे दुबई येथे शाल श्रीफळ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. तर राम रहीम नगर श्रीरामपूर ग्रामपंचायत अंतर्गत शेख फरीदभाई मित्र मंडळातर्फे केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाहीनबाग कमिटी तर्फे सय्यद अतिकोद्दीन यांच्या संपर्क कार्यालयासमोर महफूज अहमद ए मामू यांचेवतीने ढोल ताशाच्या तालावर नाचून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात केक कापला आणि वाढदिवस साजरा केला.तर मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्तदान
डी.एन. ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मेडिकेअर हाॅस्पीटल मध्ये सिकलसेल च्या अंतर्गत भरती असलेल्या रुग्णांना रक्तदान करून आपल्या सामाजिक बांधिलकी जपली शेवटी स्नेहभोजननंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता डी एन ग्रुप चे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले



