राजकिय

उद्या खासदार संजय देशमुख यांचा माळपठारावरील ४२गावाच्या वतीने नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन!

पुसद : यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसद तालुक्यातील माळ पठारावरील ४२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, या भागातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इसापूर धरणातून लिफ्ट इरिगेशन प्रणाली सुरू करावी, अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांच्याकडे केली केली होती तसेच ही मागणी लोकसभेत सभागृहातही लावून धरली होती. त्यामुळे माळपठारावरील ४२ गावाच्या वतीने ता.१७ एप्रिल २०२५ रोजी गुरुवारी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास फेट्रा येथे हा नागरी सत्कार नागरी सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे.

यावेळी या नागरी सत्कार सोहळ्याच्या आयोजित कार्यक्रमाला यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख अध्यक्ष व सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पुसद मतदारसंघाचे आमदार तथा नामदार इंद्रनील मनोहरराव नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सुद्धा यावेळी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती व प्रमुख पाहुणे माजी आमदार ॲड.निलयभाऊ नाईक विधान परिषद सदस्य, ययाती मनोहरराव नाईक उपाध्यक्ष बाबासाहेब नाईक सूतगिरणी उ पिंपळगाव, ॲड.आशिष भाऊ पंजाबराव देशमुख बार कौन्सिल सदस्य दिल्ली, डॉ.मोहम्मद नदीम साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश, अनुकूल विजयराव चव्हाण संचालक मध्यवर्ती बँक यवतमाळ, प्रवीणभाऊ शिंदे जिल्हाप्रमुख यवतमाळ उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, पंजाबराव भोयर तालुका अध्यक्ष भाजपा, किरण भाऊ ढेकळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष अजित दादा गट, विठ्ठल मळगणे सेवानिवृत्त वन अधिकारी, रामरावजी काळे माजी शिक्षण अधिकारी, समन्वयक शिवसेना यवतमाळ जिल्हा ठाकरे गट माधवरावजी वैद्य, माजी समाज कल्याण आयुक्त, संभाजीराव सरकुंडे माजी आयुक्त, अमरावती, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी माळ पठारांमधील लिफ्ट इरिगेशन पाण्याच्या संदर्भात कोणतेही राजकारण न करता विकासाकरिता सर्वांना एकत्रित बोलावले असून माळ पठारावरील ४२ गावातील शेतकरी बांधव शेत मजूर तसेच महिला भगिनी व सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत व सहकार क्षेत्रातील व्यक्ती यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे माळपठार ४२ गाव कृती समिती व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे .तसेच या कार्यक्रमात तालुक्यातील शेती व नागरिकांना बारमाही पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन तसेच ऊसतोड कामगारांच्या समस्या बाबत आढावा बैठक आयोजित करून विविध विषयावर चर्चा व विचार विनिमय करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने शेतकरी शेतमजूर महिला बंधूंना भगिनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान माळपठार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close