ईतर

जीवनात यशस्वी होण्यासाठी खिलाडूवृत्तीने जय—पराजय स्विकारा -नगरध्याक्षा ॲड.मोहीनीताई नाईक

पुसद : राजकारण, समाजकारण,खेळ,क्रीडा अथवा कुठल्याही क्षेत्रात जय—पराजय हा खिलाडूवृत्तीने स्विकारल्यासच जीवनात यशस्वी होता येते असे प्रतिपादन पुसद नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अॅड.मोहिनी नाईक यांनी केले.त्या श्रीरामपूर केंद्रातील बोरी येथील सेन्ट मेरीज् शाळेत सोमवारी(ता.२९) आयोजित पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील जि.प.शाळांच्या तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धांच्या उद् घाटन प्रसंगी उद् घाटक म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड होते.प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा अधिकारी श्रद्धा सावंत —घाडगे, पुसद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धीरज आडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव सरकुंडे, क्रीडा सचिव व शिक्षण विस्तार अधिकारी उमेश वाघमारे,गट समन्वयक शितलकुमार वानखडे, विश्रांती फोपसे,अमित बोजेवार, सुनील गवळी, सेंट मेरीज शाळेचे व्यवस्थापक संजय बोदक, मुख्याध्यापिका ब्रिजिड रेन्थली,केंद्रप्रमुख अनिल आहाळे, भारत जांभूळनकर, करुणा काळे, मंजुषा जोशी संगीता निस्ताने, प्रकाश टेकाळे, प्रेमदास राठोड,प्रदीप मोहटे,नंदेश चव्हाण, पि.के.जाधव, मनीष राठोड,यशवंत अगम,देवानंद मोहिते, क्रीडा समन्वय गोविंद जाधव,श्री.होंडे,महेश पाल,विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यानंतर आयोजकांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲड.मोहिनी नाईक यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.पुसद पंचायत समितीतील सोळा केंद्रात पार पडलेल्या खेळ, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून तालुकास्तरावर निवड झालेल्या शाळांसाठी श्रीरामपूर केंद्रातील सेन्ट मेरीज् इंग्लिश शाळेत ता.२९ ते ता. ३१ दरम्यान तालुकास्तरीय प्रक्रम ब व क गटातील सांघिक,वैयक्तीक व मैदानी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनाचे उद् घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत व क्रीडा ध्वज फडकावून करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राठोड यांनी अशाप्रकारच्या स्पर्धांमधूनच देशातील खेळाडू तयार होऊ शकतात असे सांगून उत्कृष्टपणे खेळ,क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पाडण्याचे आयोजकांना आवाहन केले. श्रद्धा सावंत यांनी खेळामधून करीअर घडविण्यासाठी स्पोर्ट सिलॅबस तयार करणार असल्याचे सांगून खेळाडूंसाठी विविध पुरस्कार व योजनांवर प्रकाश टाकला.धिरज आडे यांनी खेळामधून आपले खरे कौशल्य सिद्ध करायचे असल्याचे सांगून समायोचित भाषण केले.वालतूर तांबडे या जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वडगाव व वसंतपूर या संघाचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेक्षणिय सामना पार पडला. प्रास्ताविकातून उमेश वाघमारे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट करुन यावर्षी जिल्हास्तरावरील चॅम्पियनशीप मिळविण्याचे मान्यवरांना आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीरामपूर केंद्राचे केंद्रप्रमुख शितलकुमार वानखडे यांनी केले.कार्यक्रमाला पुसद तालुक्यातील सोळा केंद्रातील मुख्याध्यापक व विविध समित्यामधील शिक्षक उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close