Uncategorizedईतर

हजारो कोटीचे देयके प्रलंबित; शासकीय कंत्राटदाराचे १९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन!

पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शासकीय कंत्राटदाराचे एक दिवसीय धरणे आंदोलन

पुसद: राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली ९० हजार कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत, यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्यातील शासकीय कंत्राटदारांची तब्बल ८९ हजार कोटींची बिले सरकारने थकवली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. या पैशांसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना वर्षभरापासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे पुसद सार्वजनिक बांधकाम विभागातील या संघटनाची सलग्न असलेल्या शासकीय कंत्राटदाराने पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  कार्यालया समोर दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी  ०३, ०४,एएमसी व इतर योजनेतील केलेल्या कामाचे देयके मिळाली नसल्याने एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले होते आजपर्यंत १० महिण्यापासुन देयक मिळाले नसल्याने वांरवार या कंत्राटदार संघटनांनी संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधी यांना पत्र व्यवहार करुन त्रस्त झाले या कंत्राटदारांवर दिवसेनदिवस बँकेचे कर्जाचा बोजा वाढत चालल्यामुळे कंत्राटदाराचे संतुलन बिघडुन त्यांच्यावर आत्महत्या करण्यांची वेळ आलेली आहे. तसेच समोरील शिल्लक राहिलेले काम करण्यांकरीता त्यांच्या जवळ पैसे उरले नाही. तरी सर्व बाबीचा विचार करुन ०३, ०४ व इतर योजनेतील केलेल्या कामाचे देयक शासनाने तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.पंरतु सरकार मात्र त्यांचे निवेदन, आंदोलन बेदखल करत आहे.‘राज्यकर्ते जोमात, असून कंत्राटदार कोमात’, आहेत ‘रुपया नाही तिजोरीत, मंत्री मात्र मुजोरीत’, ‘राज्यशासन कंत्राटदारांना देईना पैका, मंत्री माझ्याच गप्पा ऐका’, ‘भीक नको हक्क हवाय, कंत्राटदारांना न्याय हवाय’, ‘नियोजनशून्य कारभारी, कंत्राटदार झाला भिकारी’ अशा घोषणा देत कंत्राटदारांनी सरकारच्या दिरंगाई धोरणाचा निषेध करीत तात्काळ शासनाने देयके देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

या एक  दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी होवून झालेले सैय्यद अन्वर अली जिल्हाध्यक्ष, राजेश आसेगावकर राज्य उपाध्यक्ष ,पी.के.जाधव, जयंत चिददरवार, अविनाश देशमुख,ननहे भाई,अमोल खडगी, योगेश‌ पांडे, अ.कादर, मिलींद देशमुख,जमीर खान,विजय ठाकरे,अझीम सैय्यद,बि.के.कंनसटरक्शन अरुण मनवर, गादेवार, अजिज खतीब,संजय बाबा, तांबेकर,अशफाक , जागींड, कनवाळे,व्यवहारे,अमेय जिल्हावार,मंगेश‌ पलीकोंडावार, हरीष हेडा, प्रमोद जाधव,बाळु पाटील, आसिफ, अजय राठोड, रोशन पवार,अयुब, पिंटु, शोएब, मुजममील आदी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close