ईतर

Zepन्यूज चा इम्पॅक्ट! लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी लाभार्थ्याची पैशाची लुट होत असल्याची बातमी प्रसिद्ध होताच नेतेमंडळी लागले कामाला!

तहसील परिसर कार्यालयांच्या परिसरात सहाय्यता कक्षाचे उद्घाटन!

पुसद: लाडकी बहिण योजनची नोंदणी नि: शुल्क सरकारची घोषणा तर पुसद तहसील कार्यालयावर दलालांकडून लाभार्थ्याची कागदपत्रासाठी पैशाची लुट

या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती तरलाडकी बहिण योजनेचा स्थानीक काही नेत्यांनी मात्र सोशल मीडियावर व वृत्तपत्रांतून बातम्या लावून नुसता गवगवा केला एखादी निवडणूक आली की पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथवर याद्या घेऊन बसतात पण या योजनेची माहित लाभार्थ्यांना देण्यासाठी त्यांना एखाद्ये साधं मार्गदर्शक केन्द्र सुद्धा सुरू करता येईना अशा आशयाची बातमी प्रकाशित होताच या बातमीची दखल लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांच्या

सौभाग्यवती सामाजिक कार्यकर्त्या सौ.मोहिनीताई नाईक यांनी दखल घेतली असून आज तहसील परिसर कार्यालयांच्या परिसरात लाभार्थी महिलांना या योजनेच्या  माहितीसाठी सहाय्यता कक्ष स्थापन करून या सहाय्यता कक्षाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सौ. मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

पुसद तालुक्यातील लाभार्थी महिलांना कमीत कमी वेळेत या योजनेचा लाभसाठो लागणारी कागदपत्रे मिळावे यासाठी तहसील परिसरात या सहाय्यता कक्षाची उभारणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्या सौ मोहिनीताई नाईक यांनी दिली.

या सहाय्यता कक्षाच्या उभारणीसाठी उपविभागीय कार्यालय व तहसीलदार कार्यालयाच्या वतीने मिळालेल्या सहकार्यासाठी सौ.मोहिनी नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्याचे आभार मानले. आमदार इंद्रनील नाईक यांनी महिला उत्कर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असल्यामुळे मतदारसंघातील अधिक अधिक माता-भगिनींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले.

या सहाय्यता कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी सौ.मोहिनीताई नाईक उपविभागीय अधिकारी बिजावार साहेब तहसीलदार जोरवर साहेब नायब तहसीलदार कदम साहेब, सदबारावजी मोहटे श्रीराम पवार , बाळासाहेब कामारकर रियासत अली, दिलीप पारध, बाबूसिंग आडे, सौ.शुभांगी पानपट्टे सौ.आशाताई चव्हाण , कयूम भाई प्रा. संजय चव्हाण, अभिजीत पवार, अभिजीत पानपट्टे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठता युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यता कक्षाच्या यशस्वीतेसाठी कौस्तुभ धुमाळे कुणाल बनसोडे सुनील ढाले श्रीकांत चव्हाण ऋषिकेश पंडितकर निखिल ठाकरे गणेश पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते अथक मेहनत घेत आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन कयूम भाई यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close