क्राइम

२४ वर्षीय तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : प्रिया देवानंद बागेश्वर उर्फ आरोही वानखेडे(२४ ) असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर तरुणी ही वरोरा येथील रहिवासी असून वणीत राहत होती. दि. २९ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. शहरातील घुग्गुस मार्गावरील कृष्णा अपार्टमेंट मध्ये बंद खोलीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रूममधून दुर्गंधी येत

असल्याने घरमालक यांनी वणी पोलिसांना माहिती दिल्याने वणी ठाणेदार प्रदिप शिरस्कर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय वणी येथे शवविच्छेदना करिता दाखल करण्यात आला. तरूणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत संशयास्पद रित्या आढळून आल्याने घातपाताची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या तरूणीचा मृत्यू दोन ते तीन दिवसापूर्वी झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close