को.दौ विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथे शिक्षण सप्ताह समापन समारोह!
पालक शिक्षक संघ कार्यकारणी गठीत!

पुसद : येथील कोषटवार दौलत खान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह समापन समारोह संपन्न झाला. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी पं स सुशीला आवटे , केंद्रप्रमुख मोहिते , शाळेचे अध्यक्ष राजूभाऊ कोटलवार, सभापती आनंद मुखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रिता बघेल , अनंत जाधव, बलराम मुराडी यांचप्रमुख उपस्थितीव मार्गदर्शनात शिक्षण सप्ताह समापन समारोह करण्यात आला.या सप्ताहाच्या नोडल अधिकारी म्हणून प्रा.अर्चना हरीमकर , शिक्षिका मीनाक्षी खंदारे-बंड व मनिष अनंतवार यांनी शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यानंतर पालक शिक्षक संघ कार्यकारणी निवड सभा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बघेल मॅडम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. शिक्षक पालक विद्यार्थी पालक संघ मध्ये कार्यकारणी अध्यक्ष सौ रिता बघेल, उपाध्यक्ष विजय निखाते, सह उपाध्यक्ष मुकुंद तगडपलेवार, सचिव कल्पना आडे, सहसचिव सुनंदा वडजे, सदस्य आनंद इंगोले, सदस्य तृप्ती मदने, विद्यार्थी प्रतिनिधी कु. जानवी कदम व अनुज बरोडकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सुनंदा वडजे तर आभार चंद्रकांत ठेंगे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने, स्नेहभोजनासह करण्यात आली. याप्रसंगी व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली तथा शिक्षणधिकारी यवतमाळ यांनी दिलेला शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.या शुभ प्रसंगी अनेक सन्माननीय पालक बंधु भगिनी तथा शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.