ईतर
जि.प.केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा हिवरा संगमच्या विद्यार्थिनींनी केला रक्षाबंधन सन मोठ्या उत्साहात साजरा!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम): महागाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हिवरा संगम येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये भाऊ आणि बहिणीचे पवित्र नाते असणारा रक्षाबंधन हा सन आज शनिवार दिनांक २ सप्टेंबरला मोठ्या उत्साही आनंदमय वातावरणात शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला 
मुलींनी स्वतः राख्या बनवून आणल्या होत्या त्यानंतर राख्या बांधण्यात आल्या सर्व मुलींनी राख्या बांधून औक्षण करुन सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या तसेच शाळेच्या प्रांगणात राखीच्या विविध कलाकृतीची सादरीकरण केले.
यावेळी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्याम बांडे सर , पाटील मॅडम ,धनवे मॅडम, बडूरे मॅडम, सह व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित होते



