Uncategorized

सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटीलांचा वाढदिवस वृक्षारोपण व दिव्यांगांना महिणाभर पुरेल एवढा  शिधा देऊन केला साजरा!

पुसद:मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोजदादा जरांगे मराठा आरक्षण चळवळीचे जनक ‘संघर्ष योद्धा’यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व अनाथ असलेल्या गरजूंना एक महिना पुरेल एवढा शिधा देण्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून शहरात विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपन करुन समाजात सकल मराठा समाजाने एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे मत इंडियन बार कौन्सीलचे सदस्य ॲड.आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

पुसद येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ”संघर्ष योद्धा ‘मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रे लेआऊट मधील छत्रपती उद्यानात आज गुरुवार(ता.१) आयोजित भव्य वृक्षारोपन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला ॲड.आशिष देशमुख,पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद,जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष शुभांगी पानपट्टे,सुशांत महल्ले आदींनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.
सकल मराठा समाजाने शरद मैंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत ठरल्यानुसार मनोज जरांगे यांचा वाढदिवस डिजे नलावता व केक न कापता समाजशील उपक्रमाने साजरा करण्याचे ठरविले होते.व त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी उचलला.
त्यानुसार तब्बल दोन ते तीन वर्षांची व तब्बल सात ते दहा फुट ऊंचीची पूर्ण वाढ झालेली आंबे,चिकू,‌ पेरु,फणस,सिताफळ आदी फळझाडांची तसेच बेल, वड,पिंपळ आदी पर्यावरणपूरक रोपे स्वखर्चाने आणून पत्रे ले-आऊटमधील छत्रपती उद्यानात लावली तसेच सुमित नर्सरीचे संचालक प्रभाकर टेटर यांनी दिलेली रोपे श्रीरामपूरातील विविध ठिकाणी मंदीरे,ओपन स्पेस असलेल्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत लावली. यावेळी शिवाजी कदम, नितीन पवार,गणेश पावडे, दीपक जाधव, किरण देशमुख सवनेकर,यशवंत देशमुख, दिलीप पाटील कान्हेकर, संभाजी टेटर, पंजाब वानखेडे, चंद्रशेखर देशमुख, प्रवीण कदम, सोनू पाटील, हरगोविंद कदम, बंडू पारटकर,प्रभाकर टेटर, चक्रधर मुळे,देविदास देवसरकर, अविनाश अडकिने,अॅड. गजानन देशमुख, करण ढेकळे,अभिजीत पानपट्टे , पंडित देशमुख कान्हेकर, गुणवंत ठेंगे, सोनू पाटील,चंद्रकांत ठेंगे,शशिकांत जामगडे यांचेसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती उद्यानाची निवड वृक्षारोपनासाठी केल्याबद्दल शरद मैंद यांना केशव चटूले,बंसी चव्हाण, सुभाष जाधव, शिंगारे,श्री. इंगोले, सुशांत महल्ले, नारायण जाधव,श्री घाडगे, संदीप देशमुख, देविदास देशमुख आदींनी धन्यवाद दिले.यानंतर काकडदाती येथील दिव्यांग व अनाथांना पुरेल एवढा तब्बल वीस हजार रुपयांचा किराणा शरद मैंद यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी प्रदान करुन मनोजदादा जरांगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला.
संचालन व आभार प्रदर्शन चंद्रकात ठेंगे यांनी केले.
फोटोओळ श्रीरामपूर : मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित ॲड.आशिष देशमुख,शरद मैंद अदि मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close