ईतर

सीएससी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा!

पुसद:शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरुन पीक विमा‎ योजनेत सहभागी होवून आपल्या पिकांना संरक्षित‎ करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. मात्र,‎ काही सीएससी केंद्रचालक ऑनलाईन अर्ज भरण्याचे‎ सेवाशुल्क म्हणून थेट १००ते१५० रुपये घेत आहे. एकीकडे‎ पाऊस उशिरा आल्यामुळे पेरण्या लांबल्या, काहींनी‎ जेमतेम पावसावर पेरणी केली असून नेमकेच उगवून‎ आलेल्या पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.‎अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी‎ केवळ एक रुपया भरण्याचे आवाहन शासनाकडून‎ करण्यात आलेले असताना सीएससी केंद्रचालक‎ त्याच्याकडून अधिक पैसे वसूल करत असल्याची तक्रार तांडा सुधार समितीच्या वतीने  तहसीलदार पुसद यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी सेतू केंद्र चालकांना प्रति अर्ज चाळीस रुपये प्रमाणे शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.तसेच सेतू केंद्रावर तसेच सूचना फलक लावणे बंधनकारक असताना सुद्धा तालुक्यातील सेतू केंद्र चालकांनी फलक लावले नाही. पिक विमा भरताना शेतकऱ्याकडून अतिरिक्त १०० ते १५०रुपये घेऊन शेतकऱ्याची आर्थिक लूट करत आहे याबाबत सर्व सेतू केंद्रावर धाड टाकून चौकशी करावी सेतू केंद्र चालकाचा परवाना रद्द करण्यात यावा. अन्यथा जनआंदोलन करावे लागेल असा इशारा संजय मदन आडे तांडा सुधार समिती जिल्हा कार्याध्यक्ष तसेच विकास राठोड आशिष राठोड यांनी निवेदनातून दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close