राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत कोषटवार विद्यालयाची उत्तुंग भरारी

पुसद: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे, द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा२०२४-२५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय पुसद च्या माध्यमिक शिक्षिका कु. मिनाक्षी कोंडबाराव खंदारे यांनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत राज्यस्तरावर यश प्राप्त केले. स्पर्धेत राज्यातून ११०४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात माध्यमिक शिक्षक गटातून यवतमाळ जिल्ह्यातून कु.मिनाक्षी खंदारे ह्यांनी एकमेव बक्षीस मिळविले. उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांचे हस्ते सन्मानपत्र व पुस्तिका देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक डॉ राहुल रेखावार ,सहसंचालक डॉ अनुराधा ओक ,विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय थिटे यांचे सह मान्यवर उपस्थित होते. राज्यस्तरीय नवोपक्रम हा शिक्षकांची उपक्रमशीलता व सृजनशीलतेला चालना देणारा आहे. कु. मिनाक्षी कोंडबाराव खंदारे गेल्या सोळा वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांनी सत्र२०२३-२४ मध्ये देखील राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेसाठी तालुकास्तरावर प्रथम व जिल्हास्तरावर द्वितीय आणि तृतीय क्रमांक चे बक्षीसही त्यांनी मिळविले आहे . मिनाक्षी खंदारे यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे, सौ रिता बघेल, पर्यवेक्षक अनंत जाधव , बलराम मुराडी यासह सर्व सहकारी यांनी अभिनंदन केले.



