सविधानाला संपविण्याचे षडयंञ करणाऱ्याचे रक्षण सुद्धा संविधानच करते- सामाजिक कार्यकर्ते सुधीर देशमुख
वसंत पार्क नागसेन बुध्द विहारात संविधान दिन साजरा

पुसद: भारतीय संविधानामुळेच देशातील सर्व जाती धर्म एकसंघ राहुन आपल्या प्रगतीशीलते कडे वाटचाल करीत आहेत हे फक्त सर्वश्रेष्ठ अशा संविधानामुळेच शक्य झाले अशे प्रतिपादन आपल्या रोकठोक मार्गदर्शनातुन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यानी केले तर संविधानामुळेच शोशीत वंचित बहुजन समाजातील सर्वच मागासवर्गीयांना आपले हक्क आणी अधीकार मिळाले ही आमच्या साठी अतिशय बहुमूल्य देणगी आहे हे प्रत्येक नागरिकाने जपायलाच हवे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी आपल्या भाषणातून केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतीमेचे पुजन करून नागसेन बुध्द विहार समितीच्या महीला मंडळाने बुध्द वंदना सादर केली तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत शहीदाना श्रद्धांजली देण्यात आली. व सामुहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.नागसेन बुध्द विहार समीती कडून वैद्यकीय व अभियांत्रिकीत शिक्षण प्रवेश निश्चित झाल्या बद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव उंदरे यानी केले तर आभार अजय उंदरे यानी केले.व शेवटी अंबादास वानखडे याचे कडून कार्तिक पौर्णिमेनिमित्त खिरदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागसेन बुध्द विहार समीती चे नामदेव धुळधुळे,अनिल पडघने, राजेश नरवाडे,अमोल धोटे,अशोक वाहुळे,महेंद्र कोल्हे, संजय खाडे,गजानन ऊंदरे,धम्मकीर्ती ढोले ,महेंद्र ऊंदरे, गजु धुळे,भगत ,भालेराव,भवरे , गोल्डी वाहुळे, स्वप्नील धुळधुळे सह नागसेन महीला मंडळाच्या सर्व ऊपासक व ऊपासीकानी उपस्थित राहुन परिश्रम घेतले..



