शैक्षणिक

श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय पुसदच्या निकालाची उज्वल परंपरा कायम

शाळेचा निकाल ९२.९२ टक्के

पुसद ः स्थानिक श्री शिवाजी माध्यमिक व उच्यमाध्यमिक विद्यालय, पुसदने नुकत्याच ऑनलाईन जाहीर झालेल्या वर्ग दहावीच्या उत्कृष्ट निकालाची उज्वल परंपरा या वर्षी सुद्धा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल ९२.९२ टक्के लागला असून विद्यालयातून कु. तन्वी बाबुराव पांढरे ही विद्यार्थीनी ९५.४० टक्के गुण प्राप्त करून प्रथम आली आहे. तर ॠतुजा लेंगरे ९२.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, कल्याणी घुगे ९०.४० टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

. एकूण ३११ विद्यार्थी परिक्षेला बसले असुन त्यापैकी २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्राविण्य श्रेणीत ४६ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत १०४ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत.
. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये विरेन चव्हाण ८८.४०, रोषणी आगलावे ८८.२०, महेश नेमाडे ८७.२०, वैष्णवी जाधव ८६.२०, राज कदम ८५.४०, एलिजा खंडारे ८५ , सागर कोटुरवार ८५, आशिष मते ८५, निवेदिता नागतुरे ८५, संकेत पोले ८५ या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले आहे.

. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष माननीय अनिरुद्ध पाटील चोंढीकर तसेच संस्थेच्या सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर यांनी अभिनंदन केले आहे.

. त्याचबरोबर मुख्याध्यापक विजय उंचेकर, पर्यवेक्षक ज्योती तगलपलेवार , सुनीता ठाकरे यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close