ईतर

नरसिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिका सोबत वैद्यकीय अधीक्षकच रॅगिंग करत असल्याचा खळबळजनक आरोप!

वारंवार लेखी तक्रार देऊनही दखल घेत नसल्याचा आरोप

पुसद: येथील नर्सिंग कॉलेजच्या परिचारीकांना मानसिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप केला आहे.सोबतच वैद्यकीय अधीक्षकच रॅगिंग करत असल्याचा खळबळजनक आरोप परिचारिकेने केला आहे.त्यांच्या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी दि.२२ ऑगस्ट २०२३ रोजी एक दिवसासाठी आंदोलनाचा पवित्र घेतला होता.परिचारिकेने पुकारलेल्या आंदोलनात समस्या ऐकून घेण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.त्यानंतर परिचारिकेने समस्यांचा पाढाच वाचून दाखवला होता.

एएनएममध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकांना क्लासरूमची सोय नाही. परिचारिका शिकविण्यासाठी एकही टीचर नाही.त्यामुळे त्यांचा शिकवणीचा वर्ग ही होत नाही. परिचारिका पिण्याच्या पाण्याची सोय नाही. दैनंदिन वापरासाठी पाणी सुद्धा नाही. परिचारिका जेवणाची व्यवस्था नसल्याने त्यांना बाहेरून द्वारे डब्बा आणून जेवण करावे लागत आहे.त्यांना लाईट बिल देखील भरावे लागत आहे. परिचारिकांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळत नाही.यासह अनेक समस्या उद्भवलेल्या असून त्या समस्येकडे वैद्यकीय अधीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना दिले वैद्यकीय अधीक्षकाने पत्र

उपजिल्हा रुग्णालयातील शासकिय निवासस्थान येथे वर्ग १ वर्ग-२, तसेच वर्ग-३ अशा प्रकारे अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान आहेत. मात्र शासकिय निवासस्थानांची दुरवस्था झालेली आहे.तरी त्याची डागडुगी करण्याची फार मोठी आवश्यकता आहे.खिडक्या द्वारे, प्रसाधन गृहे तसेच प्लम्बींग मुळे पाण्याचा प्रश्न सुदधा आहे. असे बऱ्याचशा अडचणी आहेत.

अनेक अडचणींना सामोरे जाण्याची आली वेळ उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील शासकिय रुग्णालयातील निवासस्थानात काही कर्मचारी राहतात तसेच उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरु झालेले नर्सीग कॉलेजची इमारत नसल्यामुळे नर्सीग कॉलेजच्या विद्यार्थीनी सुदधा राहतात.प्रथम वर्षाचे १० तसेच व व्दीतीय वर्षाचे ४० विद्यार्थीनी राहतात. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या शासकिय निवासस्थानाची डागडुगी करून देण्यात याची त्यात प्रामुखाने खिडक्या,दारे, स्नानगृहे,प्रसाधन गृहे,प्लम्बींग, इत्यादी महत्वाची कामे आहेत.   वैद्यकीय अधीक्षकाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल

प्रशिक्षण घेणारा परिचारिकाच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.त्या समस्या आमदार इंद्रनील नाईक यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील.आमदार इंद्रनील नाईक यांच्यामार्फत संबंधितांना पत्र देण्यात येऊन चौकशी मागणी करण्यात येईल व दोषी आढळल्यास त्यांच्यामार्फत कारवाई करण्यात येईल.-ॲड.मोहिनीताई नाईक, सामाजिक कार्यकर्त्या,पुसद

आठ समस्याचे निवारण झाले. नरसिंग कॉलेजच्या समस्या घेऊन मी मंगळवार दि.२२ ऑगस्ट रोजी सीएस कार्यालय यवतमाळ येथे आलो आहे.सीएस कार्यालयाने आठ समस्याचे निवारण करून दिले आहे.शिकवणीसाठी दोन सिस्टरची नियुक्ती केली आहे. त्यापैकी एका सिस्टरला तात्काळ नियुक्त होण्याचे पत्र दिले आहे. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तोडगा काढण्यात आला आहे.संबंधित नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी रॅगिंग करत आहेत किंवा हात पकडण्याचा केलेला आरोप चुकीचा आहे.-डॉ.आशिष कदम, वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय पुसद.

सुख सुविधा मिळतील या आशाने आम्ही आमच्या पाल्यांना प्रवेश घेतला परंतु येथे आमच्या पाल्याची हेळसांड होत आहे.

आमच्या पाल्यांना येथे चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून प्रवेश घेतला.सोबतच चांगली सोय मिळेल म्हणून आम्ही आमच्या पाल्यांना पाठविले.परंतु आमच्या पाल्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.येथे पाहिजे त्या सुविधा मिळत नाही.त्यामुळे आम्ही आमच्या पाल्यांना घरी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. वेळत समस्या न सोडविल्या नाहीतर आमच्या पाल्यांना घरी घेऊन जावु संबंधित प्रशासनाने तात्काळ प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी.-एम.मारकुटे,पालक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close