राजकिय

पुसद भाजपा तालुका अध्यक्षपदी पंजाब भोयर तर शहराध्यक्षपदी दीपक परिहार यांची निवड!

पुसद:भारतीय जनता पक्ष पुसद जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी पुसद जिल्हा भाजपची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षाची व इतर पदाधिकाऱ्याची निवडीचे परिपत्रक जाहीर केले.अनेक वर्षापासून भाजपामध्ये काम करणारे निंबी येथील पंजाब भाऊराव भोयर यांची पुसद ग्रामीणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच बरोबर पुसद शहर अध्यक्षपदी दीपक परिहारउमरखेड ग्रामीण अध्यक्षपदी सुदर्शन रावते उमरखेड शहर अध्यक्षपदी प्रकाश दुधेवार महागाव ग्रामीण अध्यक्षपदी दीपक आडे, महागाव शहराध्यक्षपदी विशाल शेबे, ढानके शहराध्यक्षपदी महेश पिंपळवार दिग्रस ग्रामीण अध्यक्षपदी सुभाष काटेकर, दिग्रस शहर अध्यक्षपदी प्रमोद बनगिनवार, नेर ग्रामीण योगेश दहेकर नेर शहर अध्यक्ष पदी राजेंद्र देऊळकर दारव्हा शहरअध्यक्ष धनंजय बलखंडे, दारव्हा ग्रामीणअध्यक्ष घनश्याम वानखेडे त्याचबरोबर दारव्हा तालुक्यातील चाळीस गावे यवतमाळ विधानसभेत येत असल्याने तेथे चाळीस गावा साठी यवतमाळ विधानसभा तील प्रभारी म्हणून गजानन गुल्हाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पक्षातील गटबाजी विचारात घेऊन सर्व गटांना सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. या नवीन कार्यकारणीच्या निवडीने भाजपाच्या वाढीसाठी बळ मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close