ईतर

भोजला आदिवासी विविध कार्यकारी संस्थेतून जिल्हा बँकेवर अनुकूल चव्हाण यांची निवड!

पुसद : तालुक्यातील भोजला येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली होती.त्या बैठकीमध्ये जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या कार्यालयाचे एक पत्र प्राप्त झाले. त्या पत्रावर दि.१८ नोव्हेंबर २०२५ रोजी संस्थेच्या संचालक मंडळाची सभा दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घेण्यात आली होती.त्यामध्ये जिल्हा बँकेवर प्रतिनिधी म्हणून अनुकूल विजयराव चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

संस्थेचे भोजला येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत सभापतीच्या अध्यक्षतेखाली विषयावर चर्चा व निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या सन २०२५ ते २०३० या पाच वर्षाकरिता संचालक मंडळाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार सूचक व अनुमोदक होण्यासाठी प्रतिनिधित्व अधिकार देण्यात आले आहे.अनुकूल चव्हाण हे संस्थेचे नियमित कर्जदार व सभासद असून त्यांची निवड करण्यात आली असल्याचे ठरावातून घोषित करण्यात आले आहे.सदर बैठकीला त्रिवेणी गणेश फोले, नानाराव खंडाळे, मधुकर राठोड, ज्ञानेश्वर मोहकर, महेश धुमाळ, मनोहर धुळे, पंजाब इंगळे, दादाराव खानजोडे, पंजाब जटाळे, सदाशिव पांडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close