ईतर

विकृत मानसिकतेचे संभाजी भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : महाराष्ट्रभर दंगली पेटवून राज्यातील सौहार्दपूर्ण वातावरण दूषित करण्यासाठी शासन पुरस्कृत असलेल्या विकृत मानसिकतेचे संभाजी भिडे ह्या माथेफिरूने चंद्रपूर व यवतमाळ येथे अनुक्रमे दि. २८ व २९ जुलै २०२३ ला भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या तमाम स्वातंत्र्ययोद्ध्यांबद्दल हिणकस शब्दात टीका केली. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडिलांबद्दल आपत्तीजनक टिप्पणी करून संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या. तसेच, स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीही बेताल व संदर्भहीन वक्तव्ये करून महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, विकृत संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला अटक करण्याऐवजी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. विकृत संभाजी भिडेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्वरित त्याला अटक करून त्याच्या नियोजित सभा रद्द करण्यात याव्या. त्याचबरोबर, भिडेच्या सभांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर ही गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मराठा सेवा संघाच्या वतीने आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, नितीन मोवाडे, संजय गोडे, विनोद बोबडे,दत्ता डोहे,शंकर पुनवटकर,मारोती जिवतोडे, पिंपळकर सर, ऍड.अमोल टोंगे, विठ्ठल भगत, मंगेश खामनकर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close