राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत बान्सी गावाला प्रथम पुरस्कार जाहीर!
बांन्सी ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल

पुसद:संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत तालुक्यातील बांन्सी ग्रामपंचायतीने यवतमाळ जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा बहुमान मिळविला असल्याने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना चमुने गावातील पाहणी केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यातील बन्सी ग्रामपंचायतीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला असून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
त्यासाठी दि.७ जुलै २०२३ रोजी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचीविभागीय तपासणी करण्यासाठी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाची चमु दाखल झाला होता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या एकजुटीने स्वच्छतेच्या क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय नेत्रदीपक कामगिरी केली असून या चमचा ने संपुर्ण गावाची पाहणी करुन विविध गावातील कार्यालयाची तपासणी
केली मोठ्या उत्साहाने गावातील नागरिकांनी या टिमचे स्वागत केले गावातील महिला , पुरुष , युवक मोठ्या प्रमाणामध्ये गावाची स्वच्छता करण्यासाठी सहभागी झाले तपासणी करण्यासाठी उपायुक्त (विकास) राजीव फडके (अमरावती विभाग), डाँ विरेंद्र आस्वार वैद्यकिय अधिक्षक यवतमाळ , निलेश दहिकर जिल्हा सरंक्षण अधिकारी महिला व बालकल्याण विभाग अमरावती सिद्धेश्वर काळुसे सहायक शिक्षण संचालक अमरावती विभाग, चंद्रमोहन कुंभारे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यवतमाळ, नरेंद्र काळबांडे सहायक,विभागीय आयुक्त अमरावती हि संपुर्ण टिम आली होती यावेळी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जय नाईक,महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सखाराम माने ,गटशिक्षण अधिकारी संजय कांबळे , डॉ. विशाल चव्हाण वैद्यकिय अधिक्षक , अमर राठोड शालेय पोषण आहार अधिक्षक,विस्तार अधिकारी टि.डी चव्हाण,के. पी.सोनटक्के , उत्तम चव्हाण , अंकित बोजेवार , दिपक मेश्राम व तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, स्थानिक कर्मचारी उपस्थीत होते.यावेळी स्वागताच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गावचे कुशल युवा सरपंच गजानन टाले यांनी केले तर सुत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंत देशमुख यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतिचे सचिव पि .आर आडे ग्रामपंचायत चे सदस्य संतोष आगलावे , अभय ढोणे, माधव डोंगरे,सुनिताबाई लथाड,शोभाबाई आगलावे, मंगलताई शर्मा ,सर्व गावातील जेष्ठ नागरिक , महिला युवक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.