राष्ट्ररक्षणासाठी मराठ्यांचा पराक्रम व्याख्यानण्याजोगा-व्याख्याते शिवरत्न शेटे

पुसद -विशाल आकाशगंगेमध्ये पृथ्वी सारखा एक छोटासा ग्रह, त्यावर १९३ देश पण तुमचा आमचा जन्म अमेरिकेत, न्यूझीलंड किंवा पाकिस्तानात झाला नाही तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला ही साताजन्माची पुण्याई आहे. राजकारणात प्रगल्भता असायला पाहिजे. स्पोर्टमन स्पिरीट असायला पाहिजे. या ठिकाणी राजन मुखरे, संघापासून सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हणून ही बाब अभिनंदनिय आहे. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे. मराठी माणसांचा हा महाराष्ट्र आहे. मराठा समूहवाचक शब्द आहे जातीवाचक शब्द नाही याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. आपल्या भाषणाच्या प्रारंभी पानिपतच्या युध्दात (१७६१ मध्ये) मराठ्यांचा तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला असेल.
परंतु तसा तो झाला नाही. कारण या युध्दानंतर अहमद शहा अब्दाली त्याच्या देशात गेला तो परतला नाही. कारण इतिहासकार साकीब उस्तैद खान व भीमसेन सक्सेना यांनी अहमद शहा अब्दाली यांनी जे म्हटले त्याचा उल्लेख केला आहे. मराठ्यांसारखी लढण्याची खुमखुमी जगात अशक्य आहे. काय मराठे लढले. राष्ट्ररक्षणासाठी मराठ्यांचा पराक्रम व्याख्यानण्याजोगा आहे. घराघरातून मराठे निघाले. या युध्दात १ लाख बांगड्या फुटल्या.दि. ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोसिमा येथे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला. तेव्हा ३ दिवसात १ लाख लोक मेले. पानिपतमध्ये तर १ दिवसात १ लाख लोक मेले. मराठा म्हणुन लढले. मराठा हा शब्द जातीवाचक नाही.असे कार्यक्रमात सोलापूर येथून आलेले प्रमुख व्याख्याते शिवरत्न शेटे उद्घाटन प्रसंगी दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी बोलत होते.
व्यासपीठापा भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई अशी सर्वपक्षीय मांदीयाळी दिसत आहे. हे चित्र महाराष्ट्र धर्म वाढविणारा आहे. त्यामुळे शरद मैट यांचे आभार माणले. दि. १५ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव २०२५ चे थाटात उद्घाटन झाले. कार्यक्रम अध्यक्ष माजी आ. विजय पाटील चोंढीकर हे होते. उद्घाटक म्हणुन ना. इंद्रनिल नाईक है. होते.
सुरूवातीला उपस्थित मान्यवरांनी शिवबांच्या पुतळ्याचे पूजन व इतर सर्व महामानवांच्या प्रतिमेस मानवंदना देण्यात आली. जिनिंग प्रेसींगच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठावर अॅड. आप्पारावं मैद, माजी आ. अॅड. निलय नाईक, माजी आ. डॉ. वजाहत मिर्झा, दिगांबर जगताप, आशिष बिजवल, हर्षवर्धन बिजे, अभिजीत वायकोस, उमेश बेसरकर, सतिष जाधव, सुरेंद्र राऊत तसेच शरद मैद, अॅड. आशिष देशमुख, अॅड. माधवराव माने, राम देवसरकर, अनिरुध्द पाटील चोंढीकर, डॉ. मोहम्मद नदीम, बाळासाहेब पाटील (कामारकर), डॉ. अकिल मेमन, पंजाबराव देशमुख (खडकेकर), राजन मुखरे, अॅड. उमाकांत पापीनवार, विकास जामकर, मोहन विश्वकर्मा, महादेवराव सुपारे, विनोद जिल्हेवार, अॅड. विश्वास भवरे, रवि ग्यानचंदानी, सुरज दुब्बेवार, प्रा. सुरेश गोफणे, डॉ. पंकज जयस्वाल, अनिल चेंडकाळे, नारायण क्षीरसागर, अशोक बाबर, माधवराव वैद्य, डॉ. आरती फुपाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. युवकांचे प्रेरणास्थान शिवशंभू या विषयावर शिवरत्न शेटे यांनी प्रभावी व्याख्यान दिले.
शिवजयंती जन्मोत्सव सोहळ्याचे प्रास्ताविक शरद मैंद यांनी केले.उत्साहात शिवरायांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. मागील ५-७ वर्षांपासून पुसद शहरात शिवरायांचे विचार मनामनात रुजले पाहिजे म्हणून शिवसामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी २० हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आणि प्रत्यक्षात १६ हजार स्पर्धकांनी भाग घेतला. शिवजयंती डिजेमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. शिवजयंती उत्सावानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. विनंतीला मान देवून विचारपीठावर पाहुणे आले आहेत त्यांचे आभार व्यक्त केले.



