ईतर

राजपुत भामटा बोगस प्रमाणपत्राची घुसखोरी थांबविण्यासाठी महागाव येथे गौर सेनेचा रास्तारोको!

महागाव/प्रतिनीधी(संदीप कदम) :- विमुक्त जातीच्या प्रवर्गातील राजपूत भामटा या मुळ जातीचे बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी समाजिक आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष विविध शासकीय नोक-या व शैक्षणिक जागेवर अतिक्रमण करुन संपुर्ण विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय सुरु केला असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गोरबंजारा समाजातील अग्रगण्य संघटना गोरसेना दि. १९ जून रोजी दुपारी १२.०० वाजता रस्त्यावर उतरुन रास्ता रोको च्या माध्यमातून मा. मुख्यमंत्र्यांना संबंधित तहसिलदारांना निवेदन दिले.
, विमुक्त जातीच्या संवर्गात राजपुत भामटा ही एक जमात असून बिगर मागास राजपूत जातीतील लोक भामटा हे शब्द जातीपुढे लावून राजपूत भामटाचे शैक्षणिक व नोक-यात नुकसान करत आहे. यासंदर्भात गोरसेनेनी दि. २२ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन केले होते. त्यानंतर दि. ११ मे २०२२ रोजी याच मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा सुध्दा काढला होता तरीही राजपूत भामटा या जातिच्या नावाने बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी शासकीय नोक-या व शैक्षणिक ठिकाणी घुसखोरी सुरुच ठेवली आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी गोरसेनेचे हे आंदोलन महागाव तालुक्यात नविन बस स्टॅड चौकात गौर सेनेचे तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत झालेे.

 

दरवर्षी राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन हजारो जागा एम.बी.बी.एस. एम.डी., बी.ए.एम.एस., इंजिनीअरींग प्रवेशामध्ये बिगर मागासांनी लुटलेल्या आहेत. असे असतांना शिंदे-फडणवीस सरकारने भामटा हा शब्दच काढण्यासाठी हालचाली सुरु केल्याने भविष्यात राजपूत भामटा व विमुक्त जातीचे आरक्षण पूर्णतः धोक्यात येणार आहे. म्हणून शासनाने सदर शब्द कोणत्याही परिस्थीतीत हटवू नये, बिगर मागास नामसाधर्म्य असलेल्या जार्तिनी गैरफायदा घेवू नये यासाठी बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी व असे बोगस प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रे देणा-या अधिका-यांवर कारवाई करावी, राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावे, जातवैधता पडताळणी समितीवर गोर बंजारा समाजाचे विमुक्त जातीचे प्रतिनिधी घ्यावे, १९३१ ज्या जनगणने प्रमाणे १९६१ च्या थाडे कमिशनच्या शिफारशीनुसार ज्या गावात वि.जा. अ. प्रवर्गातील मुळ राजपुत भामटा वास्तव्याला होता त्या गावाच्या नावाची जातीनिहाय यादी दरवर्षी प्रदर्शित करण्यात यावी, राजपूत भामटा मधील भामटा शब्द वगळू नये आदि मागण्यांसाठी गोरसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडले असून भटक्या विमुक्त जातीच्या हजारो लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गोर सेनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष किशोर चव्हान व महागाव तालुका अध्यक्ष आजेश जाधव यांनी केले होते. भविष्यात आमच्या मागण्या पुर्ण न केल्यास येणा-या निवडणूकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रा. संदेशभाऊ चव्हाण यां काहीनी दिला.त्यावेळी – गोर सेना या संघटनेचे महागाव ,, उमरखेड , येथील कार्यकर्ते व VJ (A) प्रवर्गातील सर्व समाजबांधव खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close