राजमाता जिजाऊ माँसाहेब म्हणजे संस्काराचे विद्यापीठ होय – प्रा गजानन जाधव

पुसद: स्वराज्याचं देखन स्वप्न आपल्या कुशीत जन्माला घालणाऱ्या त्या स्वप्नाचे बीज महाराष्ट्राच्या मातीत रोवणाऱ्या त्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविणाऱ्या, फुलविणाऱ्या स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा जन्म म्हणजे 12 जानेवारी 15 98 रोजी महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न आहे. आपल्या बहुआयामी गुणांनी शिवबांवर संस्कार करणाऱ्या त्या खऱ्या अर्थाने संस्काराचे विद्यापीठ आहेत असे गौरव उद्गार राष्ट्रीय सेवा योजना यवतमाळ जिल्हा समन्वयक प्रा गजानन जाधव यांनी काढले ते मनोहरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय गुंज राष्ट्रीय सेवा योजना+2 ग्रामीण विशेष शिबिर दत्तक ग्राम सार किनी येथे जिल्हा समन्वयक म्हणून भेटीदरम्यान स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते उद्बोधन सत्राच्या अध्यक्षस्थानी पुष्पावंती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा गणेश राव रावते, प्रमुख वक्ते प्रा गजानन जाधव ,प्रा आमिर खान, माजी स्वयंसेवक राजनंदिनी, सायली विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या स्वागतनंतर , स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. रा से यो कार्यक्रमाधिकारी प्रा एस एम जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून ग्रामीण शिबिराच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसात राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही हिंदुस्थानच्या छाताडावर थयाथया नाचत असताना छत्रपती शिवराय जन्माला आले. छत्रपती शिवरायांवर या मातेने प्रचंड संस्कार करून रयतेचे राज्य निर्माण करण्याची प्रेरणा शिवरायांना दिली अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, आणि घरातील माय याकडे कोणी वाकड्या नजरेने पहात असेल तर त्याची गय करू नका हे विचार शिवबांच्या मनावर बिंबवले त्यामुळेच जगात अनेक राजे होऊन गेले पण स्त्रियांचा सन्मान करणारा एकमेव राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्या जाते हे केवळ एका मातेच्या संस्कारामुळे शक्य झाले आहे.12 जानेवारी विदर्भाच्या इतिहासातील स्वर्ण दिवस असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रा गणेशराव रावते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून जिजाऊंच्या बहुआयामी गुणांचे दर्शन घडवून त्यांच्या संस्कार मुळे शून्यातून विश्व निर्माण करणारे असामान्य व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी राजे निर्माण झाले असे विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थिनी यांनी केले प्रा आमिर खान यांनी उपस्थित्यांचे आभार मानले. सुरू असलेले शिबिर उत्तम पद्धतीने सुरू असल्याचे समाधान व्यक्त करून त्यांनी पुढील शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाधिकारी एस एम जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रा.खाडे, सर्व स्वयंसेवक शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.



