Games

पुसदच्या केदार जगतापला बेस्ट बॅट्समन पुरस्काराने सन्मानित!

पुसद ता.१८: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या २०२३-२४ च्या जिल्हास्तरीय दोन दिवसाच्या खैरागड चषक लीग सामन्यात उत्कृष्ट फलंदाज म्हणून पुसदच्या केदार कैलास जगतापचा बेस्ट बॅट्समन म्हणून गौरव करण्यात आला. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे ता.१७ ला हा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय संघाचे बाॅलिंग कोच परास महाम्बरे यांची उपस्थिती लाभली. व्हीसीए अध्यक्ष विनय देशपांडे, सचिव संजय बदकस व प्रशांत वैद्य यांनी बक्षीस वितरण करून खेळाडूंना मार्गदर्शन केले. २०२३-२४ चा खैरागड चषक यवतमाळ जिल्ह्याने पटकावला होता. याच चषकातील उत्कृष्ट फलंदाज म्हणून केदार जगताप मानकरी ठरला. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अमरावती संघाचा मल्हार शिखरे तसेच आॅल राऊंडर म्हणून वर्धा टीमचा मंदार घोडमारे यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत केदारने ८ डावात ८४ चौकार व ६ षटकारासह सर्वाधीक ६०२ धावा केल्या होत्या. तसेच उपांत्य सामन्यात वर्धा संघाविरुद्ध तीहेरी शतकासह नाबाद ३२७ रनची खेळी केली होती. मार्च मध्ये विविध जिल्ह्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विदर्भातील एकूण आठ जिल्हाचा सहभाग होता. केदार हा स्थानिक देशमुख नगरातील रहिवासी, तसेच पत्रकार कैलास जगताप यांचा मुलगा आहे. जिल्हा समन्वयक बाळू नवघरे व प्रशिक्षक दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ टीम चॅम्पियन ठरण्यात टीमचा कर्णधार तसेच सलामीचा फलंदाज केदारचा मोलाचा वाटा राहीला. त्याने आपल्या यशाचे श्रेय त्याला क्रिकेटचे बाळकडू देणारे आशीष शुक्ला, तसेच आई वडिलांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close