पुसद पोलीस उपविभागात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या विरुद्ध कारवाई करणार! -हर्षवर्धन बि.जे. सहा पोलीस अधीक्षक पुसद!

पुसद : पोलीस उपविभागात कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दि,१५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ते१२ हर्षवर्धन बी.जे. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या आरसीपी पथकाने पुसद शहरातील जास्त वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेवर धुम्रपान तसेच मद्यपान करून असभ्यवर्तन करणारे तसेच रात्रीच्या वेळी ट्रिपल सीट मोटरसायकल चालविणाऱ्या इसमावर मुंबई पोलीस अधिनियम तसेच मोटर व्हेईकल ॲक्ट नुसार १६ इसमावर कार्यवाही करण्यात आली आहे.या कार्यवाहीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निरीक्षण करून धूम्रपान करणाऱ्या व ट्रिपल सीट मोटरसायकल चालविणाऱ्या तसेच स्थानिक नागरिकांशी असभ्य वागणूक देत मद्यपान करणाऱ्या इसमांचे समुपदेशन करून त्यांनी अशा प्रकारची कृती पुन्हा करू नाही यासाठी त्यांना पोलिसांच्या वतीने ताकीद देण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीस दल नेहमी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदैव तत्पर असून अशाप्रकारे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा मोकळ्या जागेवर धुम्रपान किंवा मद्यपान तसेच गैरवर्तन करणाऱे दिसून असल्यास जागरूक नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन अथवा डायल ११२ला कॉल करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.