राजकिय

पुसद नगरपरिषदेत विषय समिती निवडीत मातब्बर उमेदवार पदाधिकाऱ्यांना ठेंगा;सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत मोठी नाराजी!

पुसद : नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर शहरवासियांचे विषय समित्यांकडे लक्ष लागून राहिले होते.त्या दि.१९जानेवारी २०२६रोजी जाहीर करण्यात आल्या असून त्यात सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी अभिजीत प्रकाश पानपट्टे, पाणीपुरवठा समितीवर राजेश मल्हारी साळुंके, शिक्षण व क्रिडा सांस्कृतिक समितीवर विठ्ठल सुदाम खडशे, नियोजन व विकास समितीवर सौ.अर्चना राजेंद्र जगताप,महिला व बालकल्याण समितीवर भाजपच्या सौ. अश्विनी विक्रांत जिल्हेवार तर महिला व बालकल्याण समितीवर उपसभापती सौ.कल्पना विष्णु शिकारे, या नवख्या महिलांची निवड झाली आहे. त्यामुळे पहिल्यावर्षी तरी मातब्बर उमेदवार मंडळींना यातून वगळले असून नगराध्यक्षपदाला अधिक वाव देण्याची संधी अधिक सामावली असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मात्र या पहिल्याच टप्प्यात पक्षाच्या नेत्यांनी बंडखोर उमेदवार पदाधिकाऱ्यांना मात्र ठेगा दाखवला असल्याचे दिसून आले असून त्यांची मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

पुसद नगरपरिषद निवडणूक संपली असून २१ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या निकालात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने गड राखला असुन राज्यमंत्री इंद्रनील मनोहरराव नाईक यांची सुविधपत्नी सौ.मोहिनीताई नाईक यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यांच्या वाट्याला -१४ जागा आल्या आहेत. यात भाजपला- ५ राष्ट्रीय काँग्रेसला- ६राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला -३जागा वाट्याला आल्या असून- ३ अपक्ष उमेदवाराला संधी दिली होती. त्यानंतर सर्वच नगरसेवक आणि मतदारांचे विषय समितीच्या निवडीकडे लक्ष लागून राहिले होते. त्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यासाठी गेले काही दिवस जोरबैठकांचा सपाटा सुरू होता. त्यावरील पडदा सोमवारी हटला असून त्यात मातब्बर पदाधिकाऱ्यांना उघडउघड बगल दिली असल्याचे दिसून आले आहे. शिवाय नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई नाईक यांना काम करण्यास पूर्ण अवकाश मिळण्यासाठी व आपले सिंहासन स्थिर होण्यासाठी सत्ताधारी गटाने बऱ्यापैकी खबरदारी घेतली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शिवाय जे काही निवडले आहे. त्यात ठेकेदारी संबंधित कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी संधी दिली असल्याने सत्ताधारी गटाची आगामी चाल त्यातून सिद्ध होत असल्याचे बोलले जात आहे.

या सभेला उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी म्हणून डॉ. आशिष बिजवल नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मोहिनी नाईक तसेच प्रभारी मुख्याधिकारी राऊत उपस्थित होते. स्थायी समितीमध्ये नगराध्यक्षा सौ. मोहिनी इंद्रनील नाईक, सौ. अर्चना राजेंद्र जगताप, यांच्यासह अभिजित प्रकाश पानपट्टे, विठ्ठल सुदाम खडसे, खान मजहर ताहेर, राजेश मल्हारी साळुंके, सौ. अश्विनी विक्रांत जिल्हेवार, नीरज जगदीश पवार, राजू नत्थूजी दुधे, डॉ. मोहम्मद नदीम यांचाही समावेश होता.नियोजन व विकास समिती सौ. अर्चना राजेंद्र जगताप ( सभापती), राजू नत्थूजी दुधे, निशांत सतिश बयास, ऋषीकेश गजानन पंडितकर, ऐश्वर्या राजेश साळुंके (बोरकर), अक्षय संजय महाकाळ, ॲड. शेख वसीम अहेमद अब्दुल रशीद, सौ. समीना खान फिरोज खान यांचा समावेश आहेत. अन्य समित्या मध्ये सर्वच पक्षाच्या नगरसेवकांचा त्या त्या समिती च्या सदस्य संख्येनुसार सहभाग होता.दरम्यान या संपन्न झालेल्या बैठकीत दिलेले हे पदे या नवख्या उमेदवाराची निवड ही त्यांची नगराध्यक्षपदासाठी झालेली (खास !) मदत अधोरेखित केली असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे सत्ताधारी पक्षात मोठा नाराजीचा सूर दिसुन येत असुन याचे परीणाम या पुढील राजकारणात शहरात सर्वसामान्यांना पाहवयास मिळणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close