पुसद कृउबा समितीचे तत्कालीन ९ संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर संचालक मंडळ बरकास्तीचे स्वप्न बघणाऱ्या संचालकांचा डाव अखेर त्यांच्यावरच उलटला; मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाकडुन याचिका खारीज!

पुसद:कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी तत्कालीन ९ संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती परंतु या माजी संचालकांचा डाव अखेर त्याच्यावरच उलटला तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी- विक्री. (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १८ अन्वये स्वीकृत केलेल्या दोन संचालका विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात दाखल केलेली रीट पिटीशन क्रमांक ५९०३/२०२४ न्यायालयाने खारीज केल्यामुळे विद्यमान सभापती सह सर्व संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,एप्रिल २०२३ अखेर पुसद कृषी बाजार समितीची निवडणूक पार पडली. १८ मे २०२३ मध्ये अमोल फुके यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित झाले. मात्र अवघ्या एका वर्षातच त्यांना या पदाचा कारभार सांभाळणे अडचणीचे ठरले. संचालक मंडळातील काही जुन्या व वरिष्ठ संचालकांकडून कामकाजात नाहक अडचणी निर्माण केल्या जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.व त्यांनी राजीनामा दिला दि८ ऑगस्ट २०२४ रोजी सभापती निवडणूक होऊन बाजार समितीत झालेल्या निवडणुकीत शेख कौसर शेख अख्तर हे सभापती पदी निवडून आले होते. त्यानंतर विरोधी गटातील पराभूत उमेदवार सौ छाया प्रशांत देशमुख यांच्यासह सर्वश्री अमोल माधवराव फुके, संतोष संभाजी कऱ्हाळे, दिनेश चंपत राठोड, विजय राधाकिसन भांगडे ,मेरसिंग रामू राठोड, रतीराव विठ्ठलराव राऊत, यशवंतराव शंकरराव चौधरी, मनोहर वसराम राठोड ह्या संचालकांनी त्याच दिवशी राजीनामे देऊन संचालक मंडळ बरकास्तीचे दिवास्वप्न बघून बाजार समितीला अडचणीत आणण्याचे अतोनात प्रयत्न करण्यात आले होते. परंतु आजच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सत्याचा विजय झाला म्हणल्यास वावगे ठरणार नाही. बाजार समितीच्या सभेत यापैकी दोन संचालकाचे राजीनामा मंजूर करून त्या रिक्त पदावर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी – विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १८ अन्वये दोन नवीन संचालक स्वीकृत करण्यात आले. राजीनामा दिलेल्या संचालकाकडून या विरोधात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात रीट पिटीशन क्रमांक ५९०३/२०२४ दाखल करण्यात आली होती. परंतु दि ९ सप्टेंबर२०२५ च्या निकालात न्यायमूर्ती एस.एस.जावळकर व न्यायमूर्ती प्रवीण एस. पाटील यांचे खंडपीठासमोर सुनावणी होऊन ९ संचालकांनी दाखल केलेली याचीका खारीज करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीचे सभापती/उपसभापती व संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला असून विरोधी गटातील राजीनामा देणाऱ्या माजी संचालकांचा अडचणीत आणण्याचा डाव त्यांचेवरच उलटला आहे. सदर याचिकेत बाजार समितीची बाजू वरिष्ठ ॲड .फिरदोस मिर्झा व सौमित्र पालीवाल यांनी मांडली.