ईतर

शेतकरी – शेतमजुरांना न्याय मिळे पर्यंत लढा सुरुच राहील – शरद मैंद

पुसद : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी,शेतमजूर, छोटे मोठे व्यवसायिक यांचे अतोनात नुकसान झाले. अश्या असंख्य संसार उध्वस्त झालेल्या शेतकरी शेतमजुरांना मुख्यमंत्री यांनी भरीव सहकार्य कराण्याची गरज असून यासाठी आपण लढा सुरूच ठेवू असा निर्धार पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी बोलून दाखविला.आज शरद मैंद यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी, शेतमजूर महिला पुरुष, गावकरी, व्यापारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून उपाययोजना करण्याची मागणी केली.या प्रसंगी काँग्रेस नेते डॉ मोहंमद नदीम, शिवसेना(उबाठा ) नेते विकास जामकर ,माजी जिप सदस्य भोलानाथ कांबळे, ओमप्रकाश शिंदे,शरद भगत,प्रभावती कांबळे यांनी संकटाच्या घडीला पूरग्रस्तांसाठी धावून आल्याबद्धल शरद मैंद यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. त्यानंतर हजारो शेतकरी, शेतमजूर, पूरग्रस्त नागरिक, व्यापारी यांचेकडून उपविभागीय अधिकारी डॉ आशिष बिजवलं यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत समोर येऊन निवेदन स्वीकारले.

या निवेदनातील मागण्या १) ज्या ज्या पुरग्रस्त गावातील नदी, नाले, ओढे हे आपला मार्ग बदलुन किंवा बांध फोडुन त्यांचे पाणी शेतात, गावात शिरल्याने नुकसान झाले त्या सर्व नदी, नाले, ओढे यांचे युद्ध पातळीवर खोलीकरण व सरळीकरण करून तिथे पुर प्रतिबंधक भिंती बांधुन देण्यात याव्या.२)पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या उपजावु शेतीला विशेष पॅकेज अंतर्गत वहीती योग्य बनवून द्यावी किंवा लागणारा संपूर्ण खर्च देण्यात यावा,३) पुरात घरे वाहुन गेली त्यांना घरकुल योजनेअंगर्तत त्वरीत घर बांधुन देण्यात यावे.४) पुरामुळे शहरी व ग्रामीण भागात ज्यांचे दुकान, व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.५)पुराने तालुक्यातील हजारो हेक्टर शेती व पिकांचे नुकसान झाले आहे या संपूर्ण नुकसानीची पूर्ण भरपाई त्वरीत देण्यात यावी.६) शेतातील पिकांच्या नुकसान भरपाईचा सरसकट विमा देण्यात यावा७) पुरग्रस्त भागातील सर्व विद्युत खांब वाहुन गेल्याने त्या सर्व गावांचा विद्युत पुरवठात्वरित सुरळीत करून देण्यात यावा.८) ज्या पुरग्रस्त गावांचे रस्ते व पुल वाहुन गेले ते त्वरीत जाण्यायेण्या योग्य बनवुन देण्यात यावे.९) ज्या पुरग्रस्तांची जनावरे पुरात दगावली, वाहुन गेली त्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, आवश्यकता भासल्यास जनावरे विकत घेण्यासाठी त्वरीत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.१०) पुसद तालुक्यातील कोपरा गावाच्या २४ वर्षीय समाधान संतोष पाईकराव याचे घरपुरात वाहुन गेल्याने नैराश्यपोटी आत्महत्या केली. त्यामुळे शासनाकडुन त्याचे कुटूंबाला शक्य ती सर्व मदत द्यावी.११)अनेक शेतातील सिंचनाच्या व गावाला पिण्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहीरी पुरामुळे खचल्या त्या विहीरीच्या दुरूस्तीसाठी मदत द्यावी. पूरग्रस्ताच्या वरील सर्व मागण्या पुर्ण करण्यासाठी यंत्रणेला तात्काळ आदेश द्यावे जेणेकरून खचलेल्या बळीराजाला धीर मिळून जिवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळेल. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ आशिष बिजवाल यांनी सदर निवेदन पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाई साठी परिपूर्ण असून सदर निवेदन तात्काळ मुख्यमंत्री यांना पाठविणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी अजय पुरोहित यांनी आभार व्यक्त केले.निवेदन देतांना शरद मैंद, डॉ. मो. नदीम, सुधीर देशमुख, विकास जामकर,मोहन विश्वकर्मा, सैयद इशत्याक, पांडुरंग व्यवहारे, मारुती भस्मे, पुसद चेंबर चे अध्यक्ष सुरज डुबेवार, सुभाष बोडखे, नारायण क्षीरसागर, दीपक हरिमकर, परमेश्वर जयस्वाल, साहेबराव ठेगे, ज्ञानेश्वर धाडे, एड. बालाजी कपटे, पंडितराव देशमुख,अशोक राऊत, अभय गडम, के जी चव्हाण, यु एन वानखडे, संजय लोंढे,वसराम चव्हाण, एड.भारत जाधव,उदय गंधेवार,संतोष अंभोरे,ललित चव्हाण, यशवंत चौधरी,आदी विविध गावातील सरपंच, पोलीस पाटील, पूरग्रस्त नागरिक शरद मैंद मित्रमंडळ चे सदस्य हजर होते. तर सदर निवेदनाच्या प्रती राज्याचेे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा वितमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार श्रीमती भावना गवळी, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी पुसद यांना देण्यात आल्या आहेत.

 

मुख्यमंत्री यांची वेळ घेणार…

आज दिलेल्या मागण्यांचे निवेदन मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे पर्यंत पोहोचेलच. त्यानंतर देखील आमदार भावना गवळी यांचे मार्फत मुखमंत्री यांची वेळ घेवून पूरग्रस्त गावातील प्रतिनिधी सोबत घेऊन मुंबई ला त्यांची भेट घेऊन आजच्या निवेदनातील मागण्या पुर्ण करण्यासाठी जोर लावणार असा शब्द यावेळी शरद मैंद यांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close