ईतर

शिवशौर्य कावड यात्रेने दुमदुमले पुसद शहर; शेकडो शिवभक्तांची हजेरी!

पुसद  : शहरात राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद मित्र परिवाराच्या वतीने २८ जुलै रोजी श्रावण मास निमित्त हिंदू संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी पहिल्या श्रावण सोमवार ला भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावली होती.
कान्हेश्वर येथील भगवान शिवच्या मंदिरापासुन कावड यात्रेला सुरूवात झाली. सकाळी ८.०० वाजेपासुनच शिवभक्त मोठ्या संख्येने कान्हेश्वर येथे जमले त्यात प्रामुख्याने युवकाचा समावेश होता. पुसद अर्बंन बँकेचे अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे सरचिटणीस शरद मैंद यांच्या हस्ते भगवान शंकराची व कावडची पुजा व आरती करण्यात आली.यावेळी शिव नामाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता. दुपारी १२.०० वाजता कान्हेश्वर मंदिरावरून या भव्य दिव्य कावड यात्रेचा प्रारंभ झाला. कावड यात्रेत भगवान शंकराची पिंड, महिला भजनी मंडळ,एका ट्रक्टरवर भगवान शिवशंकराची भव्य मुर्ती, दुस-या ट्रॅक्टरवर प्रभु श्रीरामाची मुर्ती तसेच तिस-या ट्रॅक्टरवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची राजसिंहासनावरची आकर्षक मुर्ती व चौथ्या ट्रॅक्टरवर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची पुर्णाकृती मुर्ती होती.हजारो युवक शिवनामाचा, श्रीरामाचा, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत कान्हेश्वर वरून कावड घेवुन निघाले. येतांना जागोजागी मोठ्या संख्येने महिलांनी कावडची पुजा भक्तीभावाने केली. कावड यात्रा कान्हेश्वर ते हुडी, हुडी ते इंदिरानगर, फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या मार्गाने इटावा वॉर्ड मध्ये आली. इटावा वॉर्डातील नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून कावड यात्रेचे स्वागत केले. महिला व बालकांनी कावड यात्रेचे ठिकठिकाणी पुजन केले. ईटावा वॉर्डपासुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात यात्रेचे आगमन झाले असता झाले असता असंख्य शिवभक्तांनी कावड यात्रेचे हर…हर..महादेव नारा देवुन स्वागत केले. तसेच शामसुंदर भारती महाराज, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी शिवभक्त मोठ्या संख्येने जमले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकानंतर कावड यात्रा सुभाषचंद्र बोस चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात यात्रा पोहचली या ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व यात्रा रात्री ८:०० वाजता बालाजी मंदिरात कावड यात्रा पोहचली. या प्रसंगी बालाजी मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी होती. बालाजी मंदिरात कावड पोहचल्यानंतर आरती करण्यात आली आणि कावड यात्रेसोबत आणलेले पवित्र जल पिंडीवर अर्पण करण्यात आले. पुसद शहर व परिसरात प्रथमच अशा भव्य दिव्य शिवशौर्य कावड यात्रेचे आयोजन शरद मैंद मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते  कावड यात्रेत पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, परमेश्वर भैय्या जयस्वाल, अजय पुरोहित,पंडितराव देशमुख कान्हेकर,सुरज डुब्बेवार, के.जी.चव्हाण, ललित चव्हाण,विलास कोरडे,राजु दळवी,उत्तम वानखेडे, रंजित सांबरे, ज्ञानेश्वर बेले,उध्दव गादेवार,राजु दळवी,नारायण जाधव,चक्रधर मुळे,सतिष जाधव,अनिल लोंढे,संजय लोंढे,नंदु देशमुख,संतोष अग्रवाल,डॉ.मुंदडा,मनिष अनंतवार,गणेश दिंडे,कैलास जळगांवकर,साहेबराव ठेंगे,गणेश डंगोरिया यांनी सहभाग नोंदविला. कावड यात्रेच्या यशस्वीतेसाठी जय दळवी, दत्ता शिंदे, आकाश दिंडे, विशाल दुधाने,गौरव सुकळकर, यश काळे, गजानन चौधरी, प्रथमेश रोडेकर, विनायक मोरे, अक्षय तावडे, करण पैठणकर, शंकर करमाळकर, गजानन महापुरे, बबलू यदमाळकर, मारुती खनके, दिपक राऊत, अभिमन्यू निकम, पवन भोयर, रोहित पौळ, अक्षय ठाकरे, वैभव काष्टे, गौरव शिंदे, सुमित वानखेडे यांनी गेल्या १५ दिवसापासुन कावड यात्रेच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close