पुसद न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न;३,९४, १७, ४४५/- रक्कम आपसी तडजोडीतून वसुल!

पुसद/ प्रतिनिधी: येथील न्यायालयात मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये दि.९ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालत मा.व्हि.बी. कुळकर्णी, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा न्यायाधीश- १, पुसद यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदर राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पॅनल क्र.१ वर पैनल न्यायाधीश म्हणून व्हि.बि. कुळकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधीश-१, पुसद, पॅनल क्र.२ वर आर. आर. मावतवाल साहेब, दिवाणी न्यायाधिश व. स्तर, पुसद पैनल क्रं. ३ वर एन. जी. व्यास, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर पुसद, पैनल क्रं. ४ वर व्हि.एस. वाघमोडे साहेब, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, पुसद, पॅनल क्र.५ वर कि. बी. चव्हाण साहेब, ६वे सह- दिवाणी न्यायाधीश क. स्तर पुसद, पैनल क्र.६ वर झेड. झेड. कादरी साहेब, ७वे सहदिवाणी न्यायाधिश क. स्तर, पुसद है पैनल न्यायाधीश म्हणून हजर होते. तसेच जिल्हा न्यायालय-१, पुसद येथील अधिक्षक व्हि.आर. बंगाले आणि विधीज्ञ ॲड. महेश पाठक, ॲड. दिनेश राठोड, ॲड. श्वेता पांढरीपांडे, ॲड. जयश्री देशमुख, ॲड. सुचिता नरवाडे, ॲड. ममता सगणे व इतर विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी हजर होते. सदर लोकअदालतमध्ये वादपूर्व प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात दावे, चेक बाऊन्स (१३८ एन. आय. ॲक्ट) प्रकरणे, वाहन कायदा संदर्भाचे प्रलंबित असलेले व इतर प्रकरणे मिळून एकूण ६२३७ ठेवण्यात आलेले असून त्यापैकी एकूण ३३४ प्रकरणं समझोताद्वारे निकाली काढण्यात आलेले असून अशी एकूण रक्कम ३,९४,१७,४४५/- (तीन कोटी चौरान्नव लाख सतरा हजार चारशे पंचेचाळीस रुपये फक्त) इतकी रक्कम आपसी तडजोडीतून वसुल करण्यात आलेली आहे.सदर लोकअदालतमध्ये तालुका विधी सेवा समिती, पुसद येथील पी. एन. भोयर, कु. ए.डी. बेले, जे. जे. जाधव, एस. एन. पाथरकर, पि. ए. कोयरे,निलेश एम. खसाळे व इतर ब-याच संख्येने न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमांचे यशस्वीतेकरीता परिश्रम घेतले.



