क्राइम

पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्डयावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची धाड;एकुण २,१३, ४६०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत!

 पुसद : येथील पापिनवार या ले-आऊटमध्ये नवरात्रिच्या अखेरच्या दिवशी देवीच्या मंडपाला लागुन असलेल्या इमारतीत अवैधरीत्या सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पुसदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा-पोलीस अधिक्षक यांनी मध्यरात्री धाड टाकली. अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून नगदी रोकडसह एकूण २ लाख १३ हजार  ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत झेप न्युजला पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी, पुसद पोलीस उपविभागातील पोलीस स्टेशनचे हद्दीतील सण उत्सव काळात सुरु असलेले अवैध धंदे आटोक्यात आणण्यासाठी पुसद शहराच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा-पोलीस अधिक्षकांनी कंबर कसली आहे त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.शहरातील येथील ले-आऊट मध्ये दि, २ ऑक्टोंबर रोजी रात्री २:०० वाजताच्या दरम्यान रात्रीची गस्त घालत असतांना हर्षवर्धन बि.जे. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकाऱी पुसद यांना खबऱ्या व्दारे गोपनिय माहिती मिळाली की, पापीनवार ले-आऊट मधील एका दुर्गामाता मंडळाच्या जवळ असलेल्या इमारतीमध्ये काही लोकं पैसा जिंकण्यासाठी हार-जितचा तिन पत्तीचा जुगार खेळ पैशाची बाजी लावुन खेळत आहे. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी, यांनी तात्काळ पुसद, आरसिपी पथक व पो. स्टॉफ सह घटनास्थळी तात्काळ रवाना होवुन धाड टाकली. सदर धाडीच्या कार्यवाही मध्ये खालील नमुद इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आहे त्यामध्ये १) निखील ज्ञानेश्वर गादेवार वय ४२ वर्ष रा. पापीनवार ले-आऊट पुसद, २) यशपाल बाबुसिंग जाधव, ३) मुडे, ४) प्रमोद जिता राठोड वय ३४ वर्ष रा. श्रीरामपुर पुसद, ५) शेख वसीम शेख शकील वय २७ वर्ष रा. शंकर नगर पुसद, ६) सोमेश दिलीप जयस्वाल वय ३१ वर्ष रा. शंकर नगर पुसद, ७) शशांक अरुन नाईक वय ३५ वर्ष रा. श्रीरामपुर पुसद, ८) मयुर श्रीराम भरगाडे वय ३६ वर्ष रा. डुबेवार ले-आऊट पुसद, ९) राहुल सुभाष राठोड वय ३० वर्ष रा. आमटी ता. पुसद, १०) वसंता रेविचंद चव्हाण वय ४३ वर्ष रा. धनकेश्वर नगर पुसद, ११) आशिष प्रेमसिंग पवार वय ३२ वर्ष रा. धनकेश्वर नगर पुसद, १२) प्रविण संभाजी कास्टे वय ३१ वर्ष रा. नविन पुसद, १३) दिपक धारेराव वानखेडे वय ३४ वर्ष रा. सावंगी ता. पुसद, १४) मारोती साहेबराव राऊत वय ३५ वर्ष रा. विठाळा वार्ड पुसद, १५) विशाल गजानन भालेकर वय ३५ वर्ष रा. सावंगी ता. पुसद, १६) विपील श्रीराम आडे वय २६ वर्ष रा. आमटी ता. पुसद असे एकुण १६ लोकांवर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही मध्ये एकुण ३४,०००/- रुपये किंमतीचे ७ मोबाईल, एकुण १,७५,०००/- रुपये किंमतीच्या ८ मोटर सायकल व ४,४६०/- रुपये नगदी असा एकुण २,१३,४६०/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कार्यवाही दि,२ ऑक्टोंबर २०२५ रोजी मा. पोलीस अधिक्षक साहेब, यवतमाळ, मा. अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद व आरसिपी पथक पुसद यांचे मार्फत करुन एकुण १६ इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ प्रमाणे कार्यवाही करुन पो. स्टे. पुसद शहर येथे अपराध क्रमांक ५४२/२०२५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच हर्षवर्धन बि.जे. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद यांनी नागरिकांना अशा प्रकारे जुगार खेळणाऱ्या इसमांची माहिती स्थानिक पोलीसांना किंवा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल व त्यामुळे अवैध धंद्यांना आळा बसेल असे पोलीसांनी आवाहन केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close