लोकनेते माजी आमदार स्व. देवराव पाटील चोंढीकर स्मृती व्याख्यान

पुसदः श्री. शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघा शाखा पुसद यांच्या संयुक्त यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष, माजी आमदार तथा श्री. शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्व. देवराव पाटील चोंढीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान पुष्पाचे आयोजन गुरुवार दि. ३० नोव्हेंबर २०२३ ला सायं. ठिक ६.०० वाजण्याच्या सुमारास श्री. शिवाजी विद्यालयाच्या देवराव पाटील चोंढीकर सभागृहात करण्यात येणार आहे. यावेळी सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) एक नवा प्रयोग या विषयावर दिग्रस येथील सेवानिवृत्त ईतिहास विभाग प्रमुख प्रा. सुधीर पाठक व्याख्यान पुष्पा गुंफणार आहेत. अविरत चालणाऱ्या व्याख्यान पुष्पाचे हे ३७ वे वर्ष आहे. पुसद शहर व परिसरातील नागरिकांनी या वैशिष्टचपूर्ण, श्रवणीय व प्रेक्षणीय व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी, कार्याध्यक्ष माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, कोषाध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर यांनी केले आहे.



