शैक्षणिक

कु.प्रियंका पाटील कामारकरची एम.पी.एस.सी.व्दारे उपविभागीय जलसंधारण अधिकारीपदी निवड!

पुसद : येथील माजी पं.स.सदस्य जयवंतराव पाटील यांची नात तर यवतमाळ जि.प.चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब उर्फ क्रांती पाटील कामारकर यांची कन्या कु.प्रियंका बाळासाहेब कामारकर पाटील हीने जिद्द,चिकाटी व कठोर परिश्रमातून एमपीएससी व्दारे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व,मुख्य व तोंडी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत सहावी रॅंक प्राप्त करुन श्रेणी-१ चा अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारुन तिची मृद व जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारीपदी निवड झाली आहे.प्रियंकाने इ. चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पुसद येथील माईसाहेब मुखरे प्राथमिक शाळेत घेतल्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पुसद येथील नामांकीत असलेल्या कोषटवार दौलतखान विद्यालयात घेत ८९.% गुण प्राप्त केले. विज्ञान शाखेतील अकरावी व बारावीचे शिक्षण लातूर येथील पुरके विद्यालयातुन २०१७ मध्ये घेत बारावीमध्ये ७५% गुण मिळवित तिने नागपूर येथील जी.एस.रायसोनी या अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरींगला प्रवेश मिळविला व ८.३ सीजीपीएने उत्तीर्ण झाली.दरम्यान प्रियंकाने २०२३ मध्ये अमरावती येथील सुपर फोर्टी या क्लासेस मधून अभ्यास करुन एमपीएससी व्दारे श्रेणी-१चा अधिकारी होण्यासाठी २०२३ ला परीक्षा दिली.पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तोंडी परीक्षेत एका गुणाने संधी हुकल्याने तिने पुन्हा २०२४ ला एमपीएससीची परीक्षा दिली.एमपीएससीचा अंतिम निकाल ता.१९ जाहीर झाला असून निकालात प्रियंका पाटीलने परिक्षार्थीमधून महाराष्ट्रातून मुलींमध्ये ६ वे तर ओबीसी प्रवर्गातून प्रथम स्थान प्राप्त करुन घवघवीत यश संपादन करुन श्रेणी एक पदी आरुढ होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले.तिची मृद संधारण विभागात उपविभागीय जलसंपदा अधिकारी पदी निवड झाली आहे.तिला क्लासेसचे प्रा.अभिषेक धामनकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल आजी,आजोबा,आई—वडील,भाऊ बहिण व नातेवाईकांसह,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड यांचेसह विविध सामाजिक संघटनांनी व पुसद वासियांनी कौतुक केले आहे.

 कठोर मेहनत व सातत्य ठेवावे.स्पर्धा परीक्षेत चॅलेंज वाढल्याने यश मिळविणे कठीण असले तरी ध्येय साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेणे व त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे- कु. प्रियंका पाटील कामारकर,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close