रावजी फिटनेस सेंटरच्या वतीने राज्यस्तरावर निवड झालेल्या वेटलिफ्टिंग खेळाडूंचा गौरव!

पुसद:बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील शालेय विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून राज्यस्तरावर अकरापैकी सहा खेळाडूंची निवड झाल्याबद्दल त्यांचा रावजी फिटनेस सेंटर मध्ये शुक्रवार ता.६ रोजी शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक निशांत बयास होते.ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिनकर गुल्हाने,रवी देशपांडे , राम देवसरकर, रावजी फिटनेस सेंटरचे प्रमुख वैभव फुके यांची प्रमुख उपस्थिती होती.अमरावती विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये पुसद येथील सतरा वर्षे वयोगटात ४५ किलो वजन गटात पूजा संजय टेपेकर प्रथम, ५५ किलो वजनगटात दिव्या दिगंबर कल्याणकर प्रथम, ६१ किलोवजन गटात पियुष किरण आढावे, ८१ किलो वजन गटात- योगेश वासुदेव धाड प्रथम आले असून या चार खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाली आहे . तसेच ५९ किलो वजन गटात सोमनाथ समाधान माटे द्वितीय, तर १९ वर्षे वयोगटात १०२ किलो वजन गटात फैजाण सलीम खान प्रथम या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड आहे.या खेळाडूंना रावजी फिटनेस सेंटरमध्ये मार्गदर्शन मिळाले असून त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी मार्गदर्शक शिक्षक अविनाश कऱ्हाळे,गोपाल चव्हाण,रोशन देशमुख उपस्थित होते. यावेळी एकोणीस वर्षापासून नियमित व्यायाम करणारे वैभव टिकायत यांना गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे निशांत बयास यांनी खेळाडूंच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.रावजी फिटनेस क्लब मध्ये मिळणारे प्रशिक्षण नक्कीच दर्जेदार आहे.त्याचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळाला. वैभव फुके यांनी रावजी फिटनेस केंद्रात व्यायामाची अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिल्याने.युवावर्गाला व्यायामासाठी प्रेरित केले आहे,असे निशांत बयास म्हणाले. खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना बलसंवर्धनासाठी पुसद येथील उद्योजक वैभव फुके प्रेरणा देत आहेत.यातून तंदुरुस्त युवा पिढी घडत आहे,हे पुसद शहरासाठी प्रशंसनीय कार्य आहे,या शब्दात प्रा. दिनकर गुल्हाने यांनी वैभव फुके यांचा गौरव केला.रवी देशपांडे यांनी राज्यस्तरावरील यशासाठीवेट वेट लिफ्टिंग खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जीम प्रशिक्षक प्रफुल्ल फुके, आदित्य पवार, मंगेश साखरे, रोशन देशमुख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला . यावेळी शुभम राठोड, नितीन राठोड, श्याम बजाज, आशिष देशमुख,श्रीराम चोपडे, डॉ.सोमेश चोपडे,राहुल कारेकर, किशोर मुत्तेलवार ,वैभव सोळंके,शंतनू राजुरकर, अनिकेत राठोड ,विजय ग्यानचंदानी,निखिल ग्यानचंदानी, अक्षय पाटील, रितेश सरगर,राजेश लांडे, विलास राठोड,ॲड. दिनेश राठोड, बब्बुभाई शिवोनिया,राहुल सहारे रोशन देशमुख,मयूर पवार, अभिजीत बासटवार उपस्थित होते.