ईतर

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रम व योग दिंडी/रॅली चे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन!

औरंगाबाद/ प्रतिनिधी:भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, योग संवर्धन संस्था, भारतीय योग संवर्धन संस्थान, शाखा-औरंगाबाद, मुंबई ओनकोकेअर सेंटर व जिल्हा प्रशासन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहरातील बळीराम पाटील विद्यालय, N-9, सिडको येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे व योग दिंडीचे आयोजन करण्यात आले.
औरंगाबााद भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, औरंगाबाद शहरातील सर्व योग संस्थांचे एकत्रित योग संवर्धन संस्था, भारतीय योग संवर्धन संस्थान, शाखा-औरंगाबाद, मुंबई ओनकोकेअर सेंटर व जिल्हा प्रशासन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 20.06.2023 (मंगळवार) रोजी बळीराम पाटील विद्यालय, N-9, सिडको, औरंगाबाद येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे व योग दिंडी/रॅली चे उदघाट्न केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, नगरसेवक नितीन चित्ते, योग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष, गोपाल कुलकर्णी, कार्याध्यक्ष, चारुलता रोजेकर, उपाध्यक्ष, नंदकुमार गुरडे, सचिव, श्रीकांत पत्की, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरचे अध्यक्ष व भारतीय योग संस्थान, शाखा-औरंगाबादचे उपप्रांतप्रधान, उत्तम काळवणे, केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख व जिल्हा परिषद औरंगाबादचे आयुष समन्वयक अधिकारी, शकील अहमद, बळीराम पाटील विद्द्यालयाचे कोषाध्यक्ष डॉ. बिपीन राठोड, मुख्याध्यापक श्रीमंगले, मुंबई ओनकोकेअर सेंटरचे डॉ. प्रकाश देवडे आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत बुके, रोप आणि पुस्तक देऊन स्वागत गीताने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय औरंगाबादकर यांनी उपस्थितांकडून योग अभ्यास करून घेतला. डॉ. भागवत कराड, संतोष देशमुख व डॉ. प्रकाश देवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली कुलकर्णी व अंजली आयचित यांनी, प्रास्ताविक चारुलता रोजेकर यांनी व आभार प्रदर्शन उमेश दरक यांनी केले. औरंगाबाद शहरात सिडकोतील विविध रस्त्या-वस्त्यातून योग दिंडी/रॅली फिरून पुन्हा बळीराम पाटील विद्यालय येथे समाप्त करण्यात आली. कार्यक्रमात पिस योग अॅकॅडमी ने योग प्रात्यक्षिक सादर केले. बळीराम पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोरा प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगरचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, सहकारी प्रिती पवार, शरद सदिगले व प्रभात कुमार तसेच योग्य संवर्धन संस्था व भारतीय योग संस्थान, शाखा-औरंगाबादच्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close