पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी पुरपिडीतांसाठी मदतीचा हात पुढे करत बेघर झालेल्या मुक्या गीताबाईला दिले घर!

पुसद: येथे १ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे धनकेश्वर ग्राम पंचायत मधील प्रभाग क्र. ३ मध्ये नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. गीताबाई गव्हारे अनाथ, भिक्षा मागून जीवन व्यतीत करणाऱ्या वृध्द महिलेचे घर वाहून गेले गीताबाई बेघर झाल्या. पावसाने कहर केल्यामुळे गीताबाईला झोपडीपासून वंचीत व्हावे लागले. पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी पुरपिडीतांसाठी मदतीचा हात पुढे केला. पुर पिडीतासाठी अन्नधान्याचे किट वाटप सुरू केले. धनकेश्वर ग्राम पंचायत मधील प्रभाग क्र.३ मध्ये किट वाटप करतांना गीताबाई असहाय उभ्या होत्या. दुःख अनावर पण मुकी असल्याने वेदना व्यक्त करता आले नाही. डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी केली. शरद मैंद यांना गीताबाईच्या वेदना दिसल्या आणि त्याच वेळेस गीताबाईंना घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आणि लवकरच आश्वासनाची पूर्तता केली. व दि.२५ 8 सप्टेंबर २०२४ रोजी घराच्या चाव्या गीताबाईंना दिल्या. त्यावेळी गिताबाई ना अश्रूं अनावर झाले आपल्याला अशक्य वाटत असलेली गोष्ट शक्य झाली. बोलता येत नसल्याने भावना व्यक्त करता जरी आली नाही तरी चेहऱ्यावर शरद मैंद यांनी केलेल्या मदतीबाबत कृतज्ञता स्पष्टपणे जाणवली. गीताबाईंच्या भावना शेजारी असलेल्या महिलेने बोलून दाखविली व शरद मैंद यांना ईश्वर मदत करेल, त्यांच्या मुलाबाळाला आशिर्वाद मिळेल असे आशिर्वाद दिले. सुहृदयी अनाथांच्या वेदना दुःखे जाणणारा शरद मैंद ! पुर पिडीतांना केवळ किट वाटपच केले नाही तर ज्यांचे कोणी नाही त्यांना ईश्वर मदत करतो असे म्हणतात. त्याच भावनेतून शरद मैंद यांनी गीताबाईला एक घर बांधून दिले व तिच्या सुपूर्द केले.