ईतर
मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिम हिवरा संगम येथील आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने वृक्षारोपण!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य वने व मत्स्य व्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात समाज बांधवा तर्फे रोग निदान शिबिर, महाआरोग्य शिबिरे, चष्मे वाटप शिबिरे,वृक्षारोपण करून साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने आज ३० जुलै २०२३ ला हिवरा संगम येथील दादाजी सत्संग आश्रम मंदिर येथे
आर्य वैश्य समाज बांधवा तर्फे विविध प्रकारचे झाडे लावून साजरा करण्यात आला तसेच तसेच मंत्री मुनगंटीवार यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी अभयजी बोंपीलवार, सुनील बोंपीलवार, संजय बोंपीलवार,भगवानराव बोंपीलवार, उज्वल आरगुलवार, शरद मोतीपवार, प्रशांत मोतीपवार, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अनेकांनी मदत केली.



